बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

!! नर्मदा परिक्रमा !!( २ )

 !! नर्मदा परिक्रमा !!( २ )





              आज परिक्रमेस सकाळी १०.३० वाजता सुरुवात झाली. परिक्रमा सुरु होण्यापूर्वी संकल्प पूजेचा कार्यक्रम असतो. याठिकाणी जलपूजनाचा धार्मिक विधी होतो. जितेंद्र जोशी यांनी याप्रसंगी पौराहित्य केले. यावेळी कन्यापूजनाचा महत्वाचा कार्यक्रम असतो. नर्मदामाईला कन्येच्या स्वरूपात पाहिले जाते. परंतु ओंकारेश्वरला व्यावसायिक स्वरुप आले आहे. येथील कन्यापूजनानिमित्त योग्य मुलींना साह्य होणे गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसत नाही असेच वाटते.         


              परिक्रमेचा सुरुवातीचा मार्ग खूपच खडतर होता त्यामुळे चालण्यासाठी खूपच वेळ लागत होता. १२/१३ किलोचे ओझे पाठीवर  घेऊन चालणे अतिशय कष्टप्रद असल्याची जाणीव झाली. हळूहळू ओझे घेऊन चालण्याची सवय होईल. दुपारी १ वाजता  मौनी बाबा गुफा आश्रम,ओंकारेश्वर येथे पोहोचलो. तेथे दुपारचा भोजन प्रसाद घेतला. थोड्याच अंतरावर श्री श्री नजर निहाल आश्रम लागला तेथेच आजचा पहिला मुक्काम झाला. येथील व्यवस्था खूपच चांगली आहे. जीवनातील ही पहिलीच परिक्रमा असल्यामुळे  वेगळाच अनुभव येत आहे. आदरातिथ्य कसे करावे हे आज प्रत्यक्ष अनुभवले.

       राजेंद्र पवार 

       ९८५०७८११७८

#narmadaparikrama #narmada #omkareshwar #lordshiva #shivalinga #narmada #narmadariver #maharashtra #satara #knadawa #narmadamai #lordshivatemple

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...