मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (१)

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (१)

                     आमची  नर्मदा परिक्रमा  प्रत्यक्ष २४ तारखेस सुरु होत आहे. ही परिक्रमा ओंकारेश्वरपासून सुरु होत असल्याने तेथे पोहचण्यासाठी  आम्ही २२ तारखेला पुण्याहून पुणे जम्मूतवी एक्सप्रेसने खांडव्यापर्यंत आलो.२२ तारखेस सायंकाळी ५.२० ला निघालेली ट्रेन २३ तारखेस पहाटे ४ वाजता खांडव्यास पोहचली. खांडवा ते ओंकारेश्वर हे अंतर ६० किलोमीटर असून हे अंतर मध्यप्रदेश परिवहन निगमच्या गाडीने पोहोचलो. या ठिकाणची परिवहन व्यवस्था महाराष्ट्र राज्यासारखी नाही. आपल्याकडे जसे वडापचे काम चालते अगदी तशीच व्यवस्था आहे. सकाळी ८.३० लाच आम्ही ओंकारेश्वर येथे पोहोचलो. याठिकाणी गजानन महाराज संस्थांनच्या निवासस्थानी पोहोचलो. या संस्थांनचे कामकाज खूपच प्रभावी आहे. या ठिकाणची निवास व भोजन व्यवस्था अप्रतिम आहे. येथे परिक्रमवासीयांना वस्त्रही प्रदान केले जाते. आम्हालाही ते मिळाले आहे. प्रत्यक्ष परिक्रमेस उद्या सुरुवात करणार आहोत.




               माझ्यासमवेत एकंबेहून श्री गोरख चव्हाण, सौ. इंदुमती चव्हाण,शिवाजी चव्हाण, किडगावहून चंद्रशेखर पवार, सौ. रेखा पवार तर बीडहून पुंडलिक पाखरे सहभागी झाले आहेत.


प्रथम थोडीशी ओंकारेश्वरबद्दल माहिती.. 





 

                 ओंकारेश्वर मंदिर भारताच्या मध्य प्रदेशातील एक हिंदू मंदिर आहे. ते मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीच्या मध्यभागी मांधाता किंवा शिवपुरी नावाच्या बेटावर वसलेले आहे. हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, शतकानुशतके भिल्ल जमातीचे लोक या ठिकाणी राहिले होते आणि आता हे ठिकाण त्याच्या भव्यतेसाठी आणि इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. हे मोरट्टाक्का गावापासून १४ किमी अंतरावर आहे. हे बेट हिंदू ओमकाराच्या आकारात आहे. येथे दोन मंदिरे आहेत . १) ओंकारेश्वर २) ममलेश्वर कारेश्वर मंदिर खूप प्राचीन नर्मदा नदीपासून आपोआप कारेश्वराची निर्मिती झाली . ही नदी भारतातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक आहे आणि आता तिच्यावर जगातील एक मोठा धरण प्रकल्प बांधला गेलेला आहे. निर्मात्याच्या मुखातून प्रथम उच्चारलेला ओंकार हा शब्द वेद पाठ केल्याशिवाय येत नाही. या ओंकाराची भौतिक देवता ओंकार क्षेत्र आहे. यात ६८ तीर्थक्षेत्रे आहेत. येथे ३३ श्रेणीतील देवता कुटुंबासह राहतात आणि २ ज्योतिषस्वरूप लिंगांसह १०८ आकर्षक शिवलिंगे आहेत. देशातील १२प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी २ज्योतिर्लिंगे मध्य प्रदेशात आहेत. एक महाकाल म्हणून उज्जैनमध्ये आणि दुसरा ओंकारेश्वरमध्ये ओंकारेश्वर- ममलेश्वर म्हणून विराजमान आहे.

                 आज आम्ही ओंकारेश्वर व ममलेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. मांधाता बेटाला प्रदक्षिणा घातली. नर्मदा व कावेरी नदीच्या संगमाच्या ठिकाणी स्नान केले. ओंकारेश्वर नगरपालिकेने भाविकांची व्यवस्था उत्तम ठेवल्याचे दिसून आले. नदीकाठचा सर्व परिसर अतिशय स्वच्छ दिसून आला. स्वच्छतेत परमेश्वर असतो हेच आज दिसून आले.
                 मी क्रमश माहिती पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे आपोआपच आपणा सर्वांची आभासी पध्दतीने परिक्रमा होईल.
       राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८


#narmadaparikrama #narmada #omkareshwar #shivaling #khandawa #narmadariver #parikramawasi #parikrama #omkareshwartemple #shivatemple #shiva #lordshiva #maharashtra #satara #satarakar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...