गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

!!नर्मदा परिक्रमा !! ( ३ )

 !!नर्मदा परिक्रमा !! ( ३ )

     श्री श्री नजर निहाल आश्रम येथे रात्रीचा मुक्काम होता. सकाळी ६ वाजता नदीवर स्नानासाठी गेलो तर पाणी  अंदाजे  १० फुटाने कमी झाले होते. येथे दररोज असे होत असते असे समजले. यामागचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याच नदीवर इंदिरासागर प्रकल्प आहे.हे धरण खांडवा जिल्ह्यात नर्मदानगर (ओंकारेश्वर )येथे आहे. हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शिवसागर जलाशयाची आठवण झाली. या धरणाची पायाभरणी २३ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती. त्यामुळेच या प्रकल्पाला "इंदिरासागर " हे नाव देण्यात आले. मुख्य धरणाचे बांधकाम १९९२ मध्ये सुरु झाले.या नदीवर १००० मेगावाटचा वीज प्रकल्प आहे. थोडे अंतर पुढे गेल्यावर  मोर टक्का गावाजवळ कालवा, रस्ता व रेल्वेमार्ग समांतर दिसून  आले हे दृश्य खूपच विलोभनीय होते. 




         मोरटक्का येथे भक्तीसागर आश्रम आहे तेथेच सकाळचा नाश्ता केला आणि दुपारचा भोजन प्रसाद  खंडवा जिल्ह्यातील  कुटार या गावी श्री माताजी नर्मदा सेवा कुटीमध्ये मिळाला . संध्याकाळी आम्ही मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बडवाह तालुक्यातील बडीअली येथील नर्मदा आश्रमात थांबलो. हा आश्रम एकदमच नर्मदा किनारी आहे.परिक्रमेत काही नव्या शब्दांची माहिती झाली. जर जेवणासाठी बोलवायचे असेल तर " भोजन की हरिहर " नाश्त्यासाठी " बालभोग",जेवण म्हणजे "भोजन प्रसाद ",एखादा पदार्थ आपणास नको असेल तर " महापुरण" असे म्हणतात. या परिक्रमेच्या निमित्ताने नव्या शब्दांची भर पडत आहे. नवीन काही शिकायचे असेल तर गाव सोडायला हवे.

            राजेंद्र पवार

       ९८५०७८११७८

@narmada #narmada #narmadaparikrama  #narmadariver #lordShiva #omkareshwar #jyotrirling #satara #khandawa #khargaon 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...