!! आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन !!
(२ऑक्टोबर )
२ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. १५ ऑक्टोबर २००७ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने गांधीजींचा जन्मदिवस अहिंसा दिन म्हणून घोषित करण्याचे ठरवले त्यास सर्व सदस्यांनी संमती दिली.भारतात सर्वधर्मीय प्रार्थना,प्रभात फेऱ्या, सूतकताई करुन हा दिवस साजरा केला जातो.
महात्मा गांधी यांच्या बद्दल माहिती
मोहनदास करमचंद गांधी जन्म: २ ऑक्टोबर १८६९ मृत्यू:३० जानेवारी १९४८ गांधीजी बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.
गांधीजी बॅरिस्टर होते, सुरुवातीस काही काळ मुंबई येथे वकिली केली नंतर मात्र ते दक्षिण आफ्रिकेला गेले तेथेच त्यांच्या जीवनास कलाटणी मिळाली. त्यांचे २१ वर्षाचे वास्तव्य दक्षिण आफ्रिकेत होते. वयाच्या ४५ व्या वर्षी१९१५ मध्ये भारतात परतले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व केले. त्यांची राहणी साधी होती. त्यांचा पोशाख पहा, फक्त पंचाच ते वापरत,सूतकताई करत,लोकांना अंगभर वस्त्र कसे मिळेल यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा. गांधीजींना आपला बराचसा काळ आफ्रिकेत तसेच भारतात तुरुंगात घालवावा लागला.
महिलांचे हक्क, दारिद्रय निर्मूलन, धार्मिक स्नेह, प्रामुख्याने स्वराज्य प्राप्ती यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.त्यांनी सत्य, अहिंसा ही तत्वे जगाला दिली. असहकार आंदोलन, चलेजाव चळवळ यामुळे संपूर्ण भारत पेटून उठला. त्यामुळे इंग्रजांना आपल्या देशातून काढता पाय घ्यावा लागला. जाताना मात्र देशाची दोन शकले करुन ब्रिटिश गेले.
गांधीजी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी धडपडत होते. काही लोकांना ते मुस्लिमधार्जिणे होते असे वाटले. त्याचा परिणाम म्हणून नथुराम गोडसे याने गांधीजी सायंकाळच्या प्रार्थनेस जात असताना जवळून गोळ्या घातल्या. "हे राम" हे त्यांचे अखेरचे शब्द होत.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना जयंती निमित्ताने भावपूर्ण आदरांजली.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा