शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

!! शिक्षक दिन !!(५ सप्टेंबर )

 

         !! शिक्षक दिन !!(५ सप्टेंबर )



              गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु- शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात.
शिक्षक दिन दरवर्षी ५ सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 'गुरु' यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं. सर्वपल्ली राधाकृष्णन  एक महान  शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं.
                  जीवनात शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्‍याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचे महत्त्व समजण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
        शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा.
    संकलक : राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८


२ टिप्पण्या:

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...