शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

!! पितामह दादाभाई नौरोजी जन्मदिन !! (४ सप्टेंबर )

 

!! पितामह दादाभाई नौरोजी जन्मदिन !!
   (४ सप्टेंबर )



         जन्म :  ४ सप्टेंबर १८२५मृत्यू : ३० जून  १९१७        हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस  पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा  वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.
             दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हटले जाते. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक. जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाउस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे ते पहिले भारतीय. भारताच्या लुटीच्या सिद्धान्ताचे जनक. १८८३ साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला.
      मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय. ते रा.गो. भांडारकर यांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. महंमद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते.
     १८४५ - स्टुडंट्स लिटररी सायंटिफिक सोसायटी ही संस्था स्थापन करण्यात सहभाग. १८८५ - भारतीय राष्ट्रीय कॉ्ंग्रेसचे संस्थापक सदस्य. १८८६, १८९३ व १९०६ - भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्षपद. ज्ञान प्रसारक मंडळींची स्थापना, बॉम्बे असोसिएशनची स्थापना, लंडन इंडियन असोशिएशन, आणि ईस्ट इंडिया असोशिएशनची स्थापना.
     अशा बहुआयामी पितामह दादासाहेब नौरोजी यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
   संकलक : राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...