शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

!! Chhatrapati Shivaji Maharaj Virtual Marathon !! (5th September )


 !! Chhatrapati Shivaji Maharaj Virtual Marathon !! 

                (5th September )




 आज ५ सप्टेंबर या दिवशी भारतभर शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकाप्रती आदर प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्याच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. आपल्या गुरु, शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

      या दिवसाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज व्हर्च्युअल मरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.मी २१ कि. मी. हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. आज मी हे अंतर १:५३:०६ (एक तास त्रेपन्न मिनिटे आणि सहा सेकंदात पूर्ण केले. आज माझ्याबरोबर महेश माने हा माजी विद्यार्थी होता. त्याच्यामुळेच हे अंतर विक्रमी वेळेत पूर्ण करु शकलो.ही स्पर्धा देशात कोठेही पूर्ण करावयाची होती. अशा स्पर्धेत रुट निवडीचे स्वातंत्र्य स्पर्धकांना असते. मी वर्णे हायस्कूल- अपशिंगे (मि.)-बोरगाव- नागठाणे-नागठाणे पेट्रोल पंप- सर्व्हिस रोडने पुन्हा बोरगाव-बोरजाई मंदिर-परत अपशिंगे(मि.)-वर्णे असा रुट निवडला होता. आज रुट सपोर्ट बाबासाहेब दिनकर निकम यांनी केला होता.

     आपण प्रथम निरोगी राहून आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करुया. ज्यांनी ज्यांनी मला घडवले त्या सर्वच शिक्षकांना विनम्र अभिवादन.

     राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...