!! क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू जन्मदिन !! (२४ ऑगस्ट )
शिवराम हरी राजगुरु जन्म:२४ ऑगस्ट १९०८मृत्यू:२३ मार्च १९३१
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख क्रांतिकारक होते. त्यांच्यासमवेत भगतसिंग, सुखदेव यांना २३ मार्च १९३१ मध्ये लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले. २३ मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो.
शहीद शिवराम हरि राजगुरू
यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात आजच्याच दिवशी १९०६ रोजी झाला. अगदी लहान वयातच त्यांचे पितृछत्र हरपले. वडिलांच्या निधनानंतर ते वाराणसीत अगदी लहान वयात संस्कृत शिकण्यासाठी आले. त्यांनी हिंदू धर्मग्रंथ आणि वेदांचा अभ्यास केला होता . त्यांना व्यायामाची खूप आवड होती आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी युद्धाच्या शैलीचे खूप मोठे चाहते होते.
वाराणसीत शिकत असताना राजगुरूंचा अनेक क्रांतिकारकांशी संपर्क झाला. चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरूवर मोठा प्रभाव होता.भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद या तरुणांनी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले. हे क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. या तरुणांनी"हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन"या संघटनेची स्थापना केली. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचे मुख्य उद्दीष्ट होते. भगतसिंग,राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सँडर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले होते.
या क्रांतिकारकांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळण्यास खूप मोठी मदत झाली.क्रांतिकारकांच्याप्रती आपण सदैव विनम्र राहूया. जन्मदिनाच्या निमित्ताने राजगुरू यांना विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा