मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

!! साहित्यिक गंगाधर गाडगीळ जन्मदिन !!(२५ ऑगस्ट )

 

!! साहित्यिक गंगाधर गाडगीळ
    जन्मदिन !!(२५ ऑगस्ट )



गंगाधर गोपाळ गाडगीळ जन्म:२५ ऑगस्ट १९२३ मृत्यू :१५ सप्टेंबर २००८   हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक ख्यातनाम मराठी लेखक आहेत.
               गंगाधर गाडगीळ यांचा जन्म आजच्याच दिवशी१९२३ मध्ये मुंबई येथे झाला. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सिडनहॅम कॉलेज आणि मुंबईतील काही इतर महाविद्यालयांमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले . ते १९६४ ते१९७१  दरम्यान प्रसिद्ध एन. एम. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे पहिले प्राचार्य होते . गाडगीळ यांनी १९८८पर्यंत साहित्य अकादमी, नवी दिल्लीच्या महासभेचे उपाध्यक्ष आणि सदस्य म्हणून काम पाहिले. १९८३ ते१९९९पर्यंत त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. अर्थशास्त्र, साहित्य, चरित्र, साहित्यिक समालोचन आणि प्रवासवर्णन यामध्ये गाडगीळ यांचे काम मोठे  आहे. ते बहुआयामी लेखक आहेत.
           गाडगीळ यांची चिकित्सक बुध्दी, प्रयोग करण्याची तयारी यामुळे त्यांचे लेखन विविधांगी आहे.खासकरून प्रवास वर्णन,नाटक, लघुकथा,विनोदी लिखाणासाठी ते प्रसिद्ध आहेत. "लिलीच फूल" ही त्यांची पहिली कादंबरी आहे.त्यांच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, मल्याळम आदि  अनेक भाषांमध्ये भाषांतर केले गेले आहे.
           गाडगीळ यांनी लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे,गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी  त्याचबरोबर मुंबईशी जवळचे नाते असल्याने  जगन्नाथ शंकरशेठ,दादाभाई नौरोजी,वालचंद हिराचंद, विश्वनाथ मंडलिक,जमशेदजी जिजिभाय,राज्यपाल माऊंसर्ट एलफिन्स्टन यांच्या जीवनावर चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी अर्थशास्त्र
या विषयाची पाठ्यपुस्तके लिहिली. गाडगीळ हे मुंबईच्या ग्राहक पंचायतिशी निगडित होते. या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी १५वर्षे काम पाहिले.गाडगीळ हे काही काळ वालचंद हिराचंद ग्रुपचे आर्थिक सल्लागार होते.
गाडगीळ यांचे काही प्रकाशित साहित्य:-
१)मानस परीक्षा
२)कडू आणि गोड
३)नव्या वाटा
४)वेगळे जग
५)कबुतरे
६)गुणाकार
७)आठवण
८)उधवस्त विश्व
९)बायको आणि डोंबल
१०)भरारी
११)बुगडी माझी सांडली ग
१२)सात मजली हास्य
         गाडगीळ यांना मिळालेले काही पुरस्कार :
१)महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९५६,१९५७,१९६०)
  २)" एका मुंगीचे महाभारत" या आत्मचरित्रासाठी  साहित्य अकादमी पुरस्कार (१९९६)
३)जनस्थान पुरस्कार (१९९७)
४) एन.सी. केळकर पुरस्कार (१९८०)
५)आर. एस. जोग पुरस्कार
          अशा बहुआयामी साहित्यिकास मानाचा मुजरा.
   संकलक : राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...