रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

!! विंदा करंदीकर जन्मदिन !! (२३ ऑगस्ट )

 


!! विंदा करंदीकर जन्मदिन !!
     (२३ ऑगस्ट )



गोविंद विनायक करंदीकर जन्म:२३ ऑगस्ट १९१८मृत्यू :१४ मार्च २०१०  हे विंदा म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय कवी, लेखक, साहित्यिक समीक्षक आणि मराठी भाषेतील भाषांतरकार होते .
      विंदानी लहान मुलांच्यासाठी सशाचे कान, परी ग परी,राणीची बाग अशा कविता लिहिल्या आहेत. स्वेदगंगा, मृदगंधा,जातक,विरुपीका हे त्यांचे कवितासंग्रह विशेष गाजले आहेत.  त्यांच्या कवितांचे इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत.
                      प्रख्यात मराठी कवी असण्याव्यतिरिक्त, निबंधकार, समीक्षक आणि अनुवादक म्हणून करंदीकर यांनी मराठी साहित्यात योगदान दिले आहे.
विंदाना मिळालेले पुरस्कार--
१) ३९ वा ज्ञानपीठ पुरस्कार (२००६)
२)केशवसुत पुरस्कार
३)नेहरु साहित्य पुरस्कार
   विंदा करंदीकर यांचे १४ मार्च २०१० रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
   विंदांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
       संकलक:  राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८
विंदा करंदीकर यांची " तेच ते,देणाऱ्याने देत जावे,भारतीय स्त्रियांचे स्थानगीत"  त्यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी यु ट्यूबची लिंक देत आहे.आपण कवितेचा आस्वाद घ्यावा.

https://youtu.be/qriaKaku_h8

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...