मंगळवार, २२ जून, २०२१

!! आंतरराष्ट्रीय विधवा दिन !!(२३जून )

 


!! आंतरराष्ट्रीय विधवा दिन !!(२३जून )



                 सर्व प्रदेशातील आणि संस्कृतीमधील सर्व वयोगटातल्या विधवा स्त्रियांसंदर्भात मुद्द्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संबोधित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने २१ डिसेंबर २०१० रोजी ठराव A/RES/65/189 मान्य करून २३ जून ही तारीख ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ म्हणून पाळण्याचे मान्य करण्यात आले.
          अशा दिनाची का गरज आहे?
        संयुक्त राष्ट्रसंघ महिला संघटनेच्या
‘2018 Turning promises into action: Gender equality in the 2030 agenda for  sestenable development' अहवालानुसार, जगभरात अंदाजे २५८ दशलक्ष विधवांपैकी दर दहामध्ये एक अत्यंत दारिद्र्यात राहते. अश्यांच्या जीवितात्पनावर परिणाम करणारे धोरणे कमी आहेत किंवा नाहीत. बर्‍याच देशांमध्ये विधवा वारसा, जमीन आणि मालमत्ता विवादांशी संबंधित शारीरिक व मानसिक हिंसेच्या बळी पडतात, ज्यामध्ये लैंगिक अत्याचारांचा समावेश आहे. अश्या महिलांवरील अत्याचार हे मानवी हक्कांचे सर्वात व्यापक उल्लंघन आहे.
       विधवा झाल्यावर, बऱ्याच देशांतील स्त्रियांना बहुतेक वारसा व जमिनीचा हक्क दिला जात नाही. त्यांना अपमानजनक वागणूक दिली जाते आणि काही ठिकाणी त्यांना जीवंत दफन करण्याची प्रथा आहे, अश्या ना-ना प्रकारे समस्यांना सामोरे जावे लागते. विधवांना वारंवार त्यांच्या घरांतून बाहेर काढले जाते आणि अगदी स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांकडून शारीरिक लैंगिक अत्याचार केले जातात आणि काहींना मारले देखील जाते.
        अश्या परिस्थितीत भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या विधवा स्त्रियांची मुले देखील अनेकदा प्रभावित होतात. कुटुंबाचा एकट्यावर कारभार पडल्याने त्यांना शाळेतून मुलांची नावे काढून घ्यावी लागतात. शिवाय, विधवांच्या मुलींसोबत अनेक गैरप्रकार होऊ शकतात. त्यामुळे हा दिन विधवांना संपूर्ण अधिकार साध्य करण्याच्या दृष्टीने आणि मान्यता देण्यासाठी कार्य करण्याची एक संधी आहे.
      आपल्या देशात सध्या तरी बरी परिस्थिती वाटते. काही ठिकाणी
विधवाना त्रास होत असेल तर आपल्या परीने कमी करण्याचा प्रयत्न करुया. त्यांना समाजात मान सन्मान देऊया.
    राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...