!! मृणाल गोरे जन्मदिन !!(२४ जून )
मृणाल गोरे जन्म:२४ जून १९२८ मृत्यू :१७ जुलै २०१२ या भारतातील समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले. या महाराष्ट्र विधानसभेत आमदार होत्या. तसेच सहाव्या लोकसभेत या खासदार होत्या.
मृणाल गोरे यांनी राष्ट्र सेवा दल संघटनेच्या माध्यमातून तरुणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली. इ.स. १९७२ मध्ये मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या. मुंबईच्या गोरेगाव उपनगरात त्या पाणीवाल्याबाई म्हणून प्रसिद्ध होत्या.
पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी ५ डिसेंबर १९५८ रोजी 'केशव गोरे स्मारक ट्रस्ट' स्थापन केला. गोरेगावातील आरे रोडला या ट्रस्टची भव्य इमारत आहे.यांच्या नेत्रुत्वाखाली मुंबईत लाटणे मोर्चा निघाला होता. लाटणे मोर्चा-जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रीयांनी १९७२ मध्ये महाराष्ट्रात आपली संघटीत ताकद दाखवून दिली.समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला. ऐन दिवाळीत तेल,तूप,साखर, रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या रॉकेल महाग झाले होते.त्यामुळे मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले.या आंदोलनाला यश मिळाले आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा अविष्कार जनतेला समजला.
मृणाल गोरे यांना विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा