!!वासुदेव हरी चाफेकर यांना फाशी !!
(८ मे )
वासुदेव हरी चाफेकर जन्म :१८८० मृत्यू : ८ मे १८९९ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. हे दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या भारतीय क्रांतिकारकांचे बंधू होत.या बंधूनी राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायात भाग घेतला होता.त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.
वासुदेवांचा जन्म १८८० मध्ये पुणे जिल्ह्यातील
चिंचवड येथे झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ रुप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले.रँडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी केली. सर्व सामाजिक संकेत पायदळी तुडविले. लोकांचा रोष ओढवून घेतला. चापेकर बंधूंच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्याचा सूड घेण्याची योजना तयार झाली.२२ जून१८९७ रोजी रँडवर बंधू दामोदर यांनी हल्ला केला.कित्येक दिवस मारेकऱ्यांचा तपास लागत नव्हता. द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे चाफेकर बंधूंना पकडण्यात आले. त्यांचेवर खटला चालविण्यात आला. ८ मे १८९९ मध्ये येरवडा तुरूंगात वासुदेव चाफेकर यांना फाशी देण्यात आले.दोन वर्षांच्या कालावधीत तिघांही बंधूंना फाशी देण्यात आले.
चाफेकर बंधू व रँडच्या खुनावर २२ जून १८९७ हा चित्रपट निघाला आहे.तो पाहण्याचा योग आला होता.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा