बुधवार, १२ मे, २०२१

 

      !! राष्ट्रीय एकात्मता दिवस !! (१३ मे )



            विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. अनेक प्रांत, अनेक भाषा, वेगळे वंश असे किती तरी एकमेकापासून दूर नेऊ शकणारे घटक या देशात आहेत. चालीरीती विषयी तर बोलायलाच नको. त्यातून जातीव्यवस्थेनी ग्रस्त झालेला समाज. मानवनिर्मित या भिंती असूनही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कलकत्ता गुवाहाटीपासून द्वारकेपर्यंत सारा भारत एक आहे अन तो राहाणार आहे, याची खात्री आहे.
           भाषा ही प्रत्येक तीस मैलांवर थोडी वेगळी होत जाते असे म्हणतात तेही खरेच. महाराष्ट्राचेच उदाहरण घ्या. पुण्याची पुणेरी, कोकणातील कोकणी, विदर्भातील व-हाडी, खानदेशातील अहिराणी या ठळक वैशिष्ट्यांसह प्रत्येक जिल्हा वेगळ्या भाषेचा आहे की काय असं वाटू लागते. प्रत्येक बोलीभाषेची खुमारी काही औरच. बोलताना हेल काढणारे, अनुनासिकात बोलणारे, खूप जलद गतीने बोलणारे --- मात्र सर्वांची भाषा एकच -मराठी. जी परिस्थिती महाराष्ट्राची आहे तीच इतर प्रांताचीही आहे.
             प्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे. भाषावर प्रांतरचनेखाली ही राज्ये करण्यात आली. एक भाषा एका राज्याची, सोळा भाषांना राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिलेला आहे तसा राज्यघटनेत व नंतरच्या घटनादुरूस्तीत उल्लेख आहे. या विविध भाषिकांना एकत्र ठेवण्याचे सामर्थ्य केवळ एकाच शब्दात आहे- भारतीय,
मी भारतीय आहे, आणि भारतीयच राहाणार आहे. कोणालाही या महान पवित्र बंधनाचा अभिमान वाटणारच. काय सामर्थ्य आहे या शब्दात?
               या वेगळेपणाने देशातील विविध प्रांताचे लोक मात्र वेगळे केलेले नाहीत. केरळचा रहिवासी केरळी, गुजराथचा गुजराथी मात्र ते सगळे सांगताना सांगतात आम्ही भारतीय. राष्ट्रीय एकात्मतेचा साक्षात्कार घ्यायचा असेल तर चला एखाद्या मोठ्या शहरात. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता, बंगलोर, हैद्राबाद कितीतरी मोठी शहरे आहेत. तेथे सर्व प्रांताचे, सर्व धर्माचे लोक राहतांना दिसतात. मात्र त्यांना आपण परक्या शहरात आहोत असे मुळीच वाटत नाही.
            परचक्राच्या वेळेस तर राष्ट्रीय एकात्मतेचे विलोभनीय दर्शन झालेले आहे. चीनने एकदा आणि पाकिस्तानने तीनदा आपल्यावर चढाई केली होती. विविध राजकीय विचारांचे सर्व पक्ष त्यांचे आपआपसातील भेद विसरून देशाच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेत. संपूर्ण देश या साऱ्यामुळे आणखीनच एकसंघ झाला.
          अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत. भाषाही एक नाही, पण सर्वजण एका सूत्राने बांधलेले आहेत. एका विचाराशी एकरूप झालेले आहेत. एका विचाराशी एकरूप राहाणार आहेत ... ते सूत्र आहे राष्ट्रीय एकात्मता. भारतात राहाणारे सारे भारतीय आणि हा देश त्यांचाच आहे.
          आपला देश जगात महान ठरण्यासाठी आपण सर्वजण राष्ट्रीय ऐक्याचे वारकरी होऊया.
     संकलक : राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...