मंगळवार, ११ मे, २०२१

जागतिक परिचारिका दिन !! (१२ मे )

 

!! जागतिक परिचारिका दिन !! (१२ मे )




          १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो.   आधुनिक परिचर्येचा पाया घालणारी ब्रिटिशप्रणेती फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस म्हणजे जागतिक परिचारिका दिन.१२ मे १८२० रोजी फ्लॉरेन्स नाईटिंगेल  यांचा जन्म झाला होता.
१८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका आधुनिक शुश्रूषा शास्त्राची जनक म्हणून संबोधिले जाते.१९६५ पासून जागतिक परिचारिका दिन साजरा करण्याचे ठरवण्यात आले होते, परंतु  प्रत्यक्षात १९७४ पासून तो साजरा करण्यात येत आहे.
       दरवर्षी जागतिक परिचारिका दिनानिमित्त एक घोषवाक्य निश्चित केले जाते.२०२० सालाचे घोषवाक्य होते" A Voice to Lead--Nursing the World to Health.
                जागतिक पातळीवर आरोग्य अारोग्याच्या गरजा, हा नेहमीच सामाजिक स्तरावर चर्चेचा विषय असतो. सध्याच्या युगातील बदललेले वातावरण, उंचावलेले आयुष्यमान, वाढलेली लोकसंख्या, जुुनाट असाध्य रोगात झालेली वाढ, नवीन रोगांची लागण झालेला इबोला, चिकनगुनिया, डेंग्यू, एचआयव्ही  कोरोना वगैरेंमध्ये सर्व देशातच उच्चप्रतीच्या परिचर्या सेवेची मागणी वाढत आहे. जागतिक स्तरावर ही मागणी वाढण्याचे कारण इबोला, एचआयव्ही,  कोरोना इतर आजारांचे जंतू देशांच्या सीमारेषा पार करू शकतात. त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम आपल्या वैयक्तिक जीवनावर होतो. अशा आजारांच्या नियंत्रणामध्ये परिचारिकांची भूमिका महत्त्वाची असते.
नर्स हा आरोग्य यं.
त्रणेतील मोठा समूह मजबूत कणा समजला जातो.
सांसर्गिक रोगांचा प्रसार रोखण्यासाठी, दुर्गम भागात आरोग्यसुविधा पोहोचविण्यात, आरोग्य सेवा वितरणात, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य पुरविण्यास नर्सेस कायम तत्पर असतात. अशा नर्सेसचा सन्मान करणारा हा दिवस. आजच्या दिनी अखंड सेवेचे व्रत घेतलेल्या परिचारिकांना मनस्वी सलाम.
      सध्या कोरोना कोविड-१९ ने जगभर थैमान घातले आहे. हा महाभयानक व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठीचे परिचारिकांचे योगदान खूपच मोलाचे आहे.त्यांची सेवा २४ तास चालू असते. घरी राहूया आणि कोरोनाला हरवूया असे सर्वसामान्य जनतेसाठी घोषवाक्य आहे. आपण घरी असताना परिचारिका मात्र रुग्णसेवेत व्यस्त असतात.
               कधी कधी आरोग्य यंत्रणेतील नियोजनाच्या अभावामुळे किंवा त्रुटीमुळे काम करताना नर्सेसना खूप शारिरीक मानसिक ताणतणाव येतो. अपुरा कर्मचारी वर्ग, अपुरी साधनसामग्री, अपुरा लोकसहभाग, अपुरे अनुदान, असमान आरोग्य वितरण प्रणाली, योग्य वेळी माहिती मिळणे इत्यादीमुळे तसेच वाढलेले कामाचे तास, कामाच्या ठिकाणी अडीअडचणी, त्यामुळे सतत ताणतणाव येऊन मानसिक संतुलन भावनावर परिणाम होऊ शकतो. स्मरणशक्ती विचार शक्तीची कुवत काम करण्यास अपुरी पडू शकते. म्हणून नर्सेसच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नर्सेसच्या आरोग्याची काळजी घेणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण त्यांचे आरोग्य चांगले तरच त्या इतरांचे आरोग्य चांगले ठेवू शकतात. हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
    चला आपण या कोरोनाच्या साथीत रात्रंदिवस राबणाऱ्या परिचारिकाना सलाम करुया.त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.
   संकलक :  राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...