!! वर्णे कोरोनामुक्त व्हावे यासाठी दादासाहेब काळंगे यांचेकडून कोरोना सेंटरसाठी १०,०००/- रुपयाची मदत !!
आज १३ मे अजिंक्य पॅनेलचे प्रमुख दादासाहेब काळंगे यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस, या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना केअर सेंटरसाठी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या सौ. कांचनताई काळंगे, भैरवनाथ पॅनेलचे प्रमुख, माजी सरपंच धैर्यशील पवार यांच्या शुभहस्ते १०,०००/- रोख देणगी देण्यात आली.
कोरोनाचा आजार आटोक्यात आणण्यासाठी नुसतीच गावातून मदत होते असे नाही तर परगावची देखील मदत होत आहे. पंचायत समितीच्या माजी सदस्या खोजेवाडीच्या रहिवासी सौ. तरडेताई यांच्याकडून १०,०००/- रुपयाची साहित्यरुपाने मदत केली. देणगीदारांचे ग्रामपंचायत ऋणी आहे.
कोरोनातून नुकतेच बरे झालेले रुग्ण अरुण हणमंत पवार यांनी कोरोना सेंटरसाठी ५०००/- रुपयाची मदत केली. या कुटुंबातील ४ सदस्य कोरोनाबाधित होते. ते सगळे बरे होऊन घरी आले आहेत. कोरोनाचा विळखा कोणत्याच कुटूंबाला पडू नये ही भावना त्यांनी देणगी देताना व्यक्त केली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधील स्थितीबाबत थोडेसे
१) एकूण रुग्णसंख्या-- १२०
२) शाळेत विलगीकरण--१४
३) गृह विलगीकरण--४६
४) मयत -- ०८
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामदक्षता समिती अतिशय उत्तम प्रयत्न करत आहे. मुंबईकरांचे गावावर विशेष लक्ष आहे. "घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी" ,याप्रमाणे नोकरी, व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी असणाऱ्या लोकांचे लक्ष अधिक असते. यापूर्वी आम्ही वर्णेकर ग्रूप, अमर शेठ, चंद्रकांत काळंगे, महेश पवार यांनी मदत केलेली आहे त्यांच्या ऋणात आम्ही कायमच राहू असे सरपंच विजयकुमार पवार म्हणाले.
आतापर्यंत आलेल्या निधीमधून विलीगीकरण मध्ये असलेल्या रुग्णांची जेवण , औषधपचार, दवाखान्यामध्ये नेणे- आणणे, काही रुग्णांना तपासणी साठी ( रक्ताच्या तपासणी , HRCT) यासाठी नेणे, सफाई, निर्जंतुकीकरणासाठी लागणारे साहित्य यासाठी खर्च केला आहे.
गाव कोरोनामुक्त व्हावे यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. आपणही ग्रामपंचायतीस आर्थिक तसेच साहित्य रुपाने मदत करु शकता. चला सर्वजण एकत्र येवूया, कोरोनाला हरवूया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा