!! जागतिक कला दिन !! (१५ एप्रिल )
जागतिक कला दिन हा ललित कलांचा आंतरराष्ट्रीय उत्सव आहे जो आंतरराष्ट्रीय कला संघटनेने(आयएए) जाहीर केला आहे जेणेकरून जगभरातील सर्जनशील क्रियाकलाबद्दल जागरूकता निर्माण केली जावी.
ग्वाडलजारा येथील आंतरराष्ट्रीय संघटनेच्या पहिल्या महासभेत १ एप्रिलला जागतिक कला दिन म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. २०१२ मध्ये हा पहिला उत्सव होता. या प्रस्तावाचे प्रायोजक तुर्कीच्या बेदरी बेकाम यांनी रोझा यांच्या सह-स्वाक्षर्याने केले होते. मेक्सिकोच्या मारिया बुरिलो वेलस्को, फ्रान्सची अॅनी पौर्नी, चीनची लिऊ डावे, सायप्रसचे क्रिस्टोस सायमॉनाइड्स, स्वीडनचे अँडर्स लिडेन, जपानचे कान इरी, स्लोव्हाकियाचे पावेल क्रॅल , मॉरिशसचे देव चूरमुन, नॉर्वेचे हिलडे रोग्सकोग यांच्या महासभेने एकमताने या प्रस्तावास मान्यता दिली.
लिओनार्डो दा व्हिंचीच्या वाढदिवसाच्या सन्मानार्थ तारखेचा निर्णय घेण्यात आला . दा व्हिंची हे जागतिक शांती, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता, बंधुता आणि बहुसांस्कृतिकता तसेच कलेचे महत्त्व याचे प्रतीक म्हणून निवड केली गेली.
लिओनार्दो दा व्हिंचीबद्दल थोडंसं--
१५ एप्रिल १४५२ या दिवशी लिओनार्दो दा व्हिंची यांचा जन्म झाला.लिओनार्दो हा एकाच वेळी चित्रकार ,शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ,शरीरशास्त्रज्ञ,गणिती, वैज्ञानिक, संशोधक, अभियंता,साहित्यिक,संगीतकार, नेपथ्यकार, लेखक, तंत्रज्ञ आणि तत्वज्ञ होता. याची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी जगप्रसिध्द कलाकृती म्हणजे " मोनालीसा"चे चित्र.१५०३ ते १५०५ अशी तीन वर्षे लिओनार्दो या चित्रावर काम करत होता. मोनालीसाच्या चेहऱ्यावरचे स्मित आजही भल्याभल्यांना कोड्यात टाकते.
२ मे १५१९ या दिवशी वयाच्या ६७व्या वर्षी,कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांत संचार करणाऱ्या लिओनार्दोने या जगाचा निरोप घेतला. आपली चित्रे, शिल्पे,आपण बांधलेल्या इमारती, पूल,तसंच आपलं संशोधन हे सारं सारं जगासाठी तो आपल्यामागे ठेवून गेला.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा