मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मदिन !! (१४ एप्रिल )

 

  !!     डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
जन्मदिन  !! (१४ एप्रिल )



डॉ. भीमराव रामजी आंबेडकर जन्म :१४ एप्रिल १८९१ मृत्यू : ६ डिसेंबर १९५६   ते बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला.१९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली. इ.स. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.डॉ. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके  उभी राहिली आहेत.
भारतीय संविधान निर्माते,दलित उद्धारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
       संकलक: राजेंद्र पवार
               ९८५०७८११७८

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...