!! गुढी पाडवा !! (१३ एप्रिल )
गुढी पाडव्याचा दिवस हा हिंदू धर्मात नव उत्सव मानला जातो. हिंदू नववर्षाला या दिवसापासून सुरुवात होते. 'गुढी' म्हणजे 'विजय पताका'. या दिवसापासून शालिवाहन शक सुरु झाले असे मानले जाते.
यादिवशी आंध्रप्रदेश , कर्नाटक आणि महाराष्ट्रात सर्व घरे आंब्याच्या झाडाच्या पानांनी सजलेली असतात.गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक गणला जातो. महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळी बनवली जाते.हा सण साधारणपणे मार्च एप्रिल महिन्यात येतो. यावेळी रात्र लहान व दिवस मोठे असतात. यावेळी वसंत ऋतूच्या आगमनाने निसर्ग नवीन रुप धारण करतो. झाडांना नवी पालवी फुटलेली असते.
गुढीपाडव्यादिवशी कडुनिंबाचे सेवन करण्याची प्रथा आहे. आगामी वर्ष कसे जाणार यासाठी पंचाग वाचनही केले जाते.
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
गुडीपडवा / नववर्ष निमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐
उत्तर द्याहटवा