!! पुणे विद्यापीठ स्थापना १९४९ !!(१० फेब्रुवारी ).
पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली.
पुणे विद्यापीठ हे भारतातील प्रमुख विद्यापीठांपैकी एक आहे. सध्याचे त्याचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे आहे.सन २०१९ च्या National Institutional Ranking Framework (NIRF) नुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात १० व्या क्रमांकावर आहे. सध्या महाराष्ट्रातील एक नंबरचे विद्यापीठ म्हणून ते ओळखले जाते. या विद्यापीठाशी ८९० महाविद्यालये व ७० संशोधन संस्था संलग्न आहेत. तर मुंबई विद्यापीठाशी ८२३ महाविद्यालये संलग्न आहेत.
नामविस्ताराविषयी थोडेसे -- स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचे नाव विद्यापीठाला देण्याचा निर्णय ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला.
या विद्यापीठाचे आवार ४११ एकर क्षेत्रावर विस्तारले आहे. पूर्वी त्याठिकाणी गव्हर्नरचे ऑफिस होते. या इमारतीत हे विद्यापीठ सुरु झाले. सध्या या इमारतीला ऐतिहासिक स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या विद्यापीठ स्थापणेपूर्वी १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना पुणे येथे झाली होती. त्यावेळी हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न होते. आज या महाविद्यालयाला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. विद्यापीठ स्थापनेवेळी मा.बी.जी. खेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्री देखील होते.
विद्यापीठाचे पाहिले कुलगुरू म्हणून डॉ.एम. आर. जयकर यांनी काम पाहिले तर सध्या डॉ. नितीन करमळकर हे कुलगुरू आहेत.सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यामध्ये विद्यापिठाचे कार्यक्षेत्र होते.शिवाजी विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर ते पुणे, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यापुरते सीमित झाले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवच्या निर्मितीनंतर तर धुळे, जळगाव हेही जिल्हे त्यामधून कमी झाले. आता तीन जिल्ह्यापुरतेच कार्यक्षेत्र मर्यादित आहे.
"य:क्रियावान स पंडित:"हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
V.nice sir👌
उत्तर द्याहटवा