सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

!! मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे स्मृतिदिन !!(९ फेब्रुवारी )

 

!! मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे स्मृतिदिन !!(९ फेब्रुवारी )



            मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे जन्म :२६ डिसेंबर १९१४ मृत्यू : ९ फेब्रुवारी  २००८ हे एक समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर  येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत. याशिवाय वन्य जीव संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत म्हणून गौरवले जाते.
               बाबा आमटे यांनी नागपूर विद्यापीठातून  १९३४ साली बी.ए. व  १९३६ साली एल्‌एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर बनावे असे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली.  १९४९-५० या कालावधीत त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोगनिदानावरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला.
           गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. १९४३ मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली . पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते. १९४९ सालामध्ये त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली.
                   बाबा आमटे यांना पद्मश्री,पदमविभूषण,महाराष्ट्र भूषण आदि राष्ट्रीय स्तरावरील तर रॅमन मॅगसेसे सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील असंख्य पुरकाराने सन्मानित करण्यात आले.
         बाबा आमटे यांचे कार्य त्यांची मुले प्रकाश आमटे, विकास आमटे आणि नातवंडेही पुढे नेहत आहेत. सहलीच्या निमित्ताने  बाबा आमटे यांचे आनंदवन ,हेमलकसा,सोमनाथ येथील कार्य जवळून पाहण्याची संधी मिळाली.
       बाबा आमटे यांना विनम्र अभिवादन, त्यांच्या कार्याला सलाम.
    संकलक: राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...