!! जमनालाल बजाज स्मृतिदिन १९४२ !!(११ फेब्रुवारी )
जमनालाल बजाज जन्म: ४ नोव्हेंबर १८८९ मृत्यू: ११ फेब्रुवारी १९४२ ते एक भारतीय उद्योगपती , परोपकारी आणि भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते . १९२० च्या दशकात त्यांनी बजाज ग्रुप ऑफ कंपन्यांची स्थापना केली .ते महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय आणि मित्र होते .
१९२० मध्ये जमनालाल बजाज भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नागपूर अधिवेशनासाठी स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले . त्यांना ब्रिटिश सरकारने रावबहादूर पदवी दिली होती तिचा त्याग करून ते असहकार चळवळीत सहभागी झाले.नागपुरात सत्याग्रह झाला होता त्यामध्ये जमनालाल बजाज यांनी भाग घेतला त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना ताब्यात घेतले. या घटनेने त्यांना खूपच प्रसिध्दी मिळाली.
वर्धा येथील सेवाग्राम आश्रमासाठी जमनालाल बजाज यांनी जमीन उपलब्ध करुन दिली. जमनालाल बजाज यांना गांधी सेवा संघाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी आपला वेळ विधायक कामांसाठी समर्पित केला. नंतर ते काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य आणि काँग्रेसचे कोषाध्यक्ष म्हणून १९३३ मध्ये निवडले गेले.
सामाजिक काम अस्पृश्यता हटविणे , हिंदीची जाहिरात करणे आणि खादी व ग्रामोद्योग अशा उपक्रमांमध्ये जमनालाल बजाज यांना रस होता . त्यांनी खादीला प्रोत्साहन देण्यासाठी देशभर दौरा केला होता. १९२५ मध्ये स्पिनर्स असोसिएशनचे कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली. ते अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले होते. हिंदी भाषेची महती वाढवण्यात त्यांचे योगदान खुप मोठे आहे. गांधी हिंदी लेखक भंडार (बुकशॉप) त्यांनी मुंबई येथे सुरू केले आणि सस्ता साहित्य मंडळाची स्थापना केली.
जमनालाल बजाज यांनी स्वतःचे लक्ष्मी नारायण मंदिर अस्पृश्यांना खुले केले. ते हरीजनासोबत भोजन घेत.हरीजनासाठी त्यांनी विहिरी खुल्या करण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या सामाजिक उपक्रमांच्या सन्मानार्थ जमनालाल बजाज पुरस्कार बजाज फाउंडेशनने सुरू केला आहे. नेल्सन मंडेलासह अनेकांना जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जमनालाल बजाज यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा