!! स्वामी दयानंद सरस्वती जन्मदिन१८२४!! (१२ फेब्रुवारी )
स्वामी दयानंद सरस्वती हे भारतीय समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक,कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे महत्व वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणारे असे होते.
आर्यसमाज -आर्यसमाजाची स्थापना १८७५ मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली." सत्यार्थ प्रकाश" हा वेदावर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातीना स्थान नव्हते. स्त्री- पुरुष समानता होती,असे प्रतिपादन त्यांनी केले."वेदाकडे परत चला" असे आर्यसमाजाचे ब्रीदवाक्य होते. आर्यसमाजाच्या भारतभर शाखा उघडल्या. आर्यसमाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था उघडल्या.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा