!! सरोजिनी नायडू जन्मदिन १८७९ !! (१३ फेब्रुवारी)
सरोजिनी नायडू यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी हैदराबाद शहरात झाला. वडील अघोरनाथ चटोपाध्याय प्रख्यात अभ्यासक व आई कवयित्री होती. त्यांनी बंगाली भाषेत लिखाण केले होते. सरोजिनी नायडू अतिशय कुशाग्र बुध्दीच्या होत्या. वयाच्या १२व्या वर्षीच १२ व्या वर्गाची परीक्षा त्या उत्तीर्ण झालेल्या होत्या. त्यावेळी अशा पध्दतीने परीक्षा देण्याची पध्दती होती. त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षीच लेडी ऑफ लेक नावाची कविता लिहिली. त्या कवयित्री म्हणूनच प्रसिध्द होत्या.
सरोजिनी नायडू यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी हैदराबादच्या निजामाने अर्थसाह्य केले. त्यांनी आपले उच्चशिक्षण लंडन येथे घेतले. सरोजिनी नायडू यांचेवर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य आंदोलनात झोकून दिले.त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. त्या खेड्यात फिरल्या, स्वातंत्र्य मिळणेसाठी पोषक वातावरण निर्माण केले.
सरोजिनी नायडू यांनी डॉ. मुतायाला गोविंदराजुलू नायडू यांच्याबरोबर विवाह केला. सरोजिनी नायडू या बहुभाषिक होत्या. त्या इंग्रजी, बंगाली,हिंदी, गुजराती मध्ये भाषण करीत. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत. आपल्या लोकप्रियतेमुळे त्या कानपुर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षा झाल्या. भारताच्या प्रतिनिधी म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेल्या.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या उत्तरप्रदेशच्या पहिल्या राज्यपाल झाल्या.त्यांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले होते. त्यांचा मृत्यू २ मार्च १९४९ रोजी झाला.महिलांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेण्याचे बरेचसे श्रेय सरोजिनी नायडू यांना जाते.
सरोजिनी नायडू यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा