!! ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन लोकार्पण सोहळा !!
आज सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी आपल्या गावचे वापी पिगमेंट्स प्रा. ली तसेच निर्भय रसायन प्रा.लीचे मॅनेजर श्री चंद्रकांत काळंगे (शशिकांत निवृत्ती काळंगे यांचे ज्येष्ठ बंधू) यांनी कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन आपल्या गावासाठी अर्पण केली. या मशीनचा स्वीकार गावच्या सरपंच सौ. रसिका काळंगे यांनी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत केला.
यावेळी चित्रपट निर्माते मानसिंग पवार यांच्या हस्ते शशिकांत काळंगे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदरच्या मशीन ग्रामपंचायतीत राहणार असून त्याचा उपयोग करण्यासाठी डॉ. अनिल पवार (९९६०६३०७९४), डॉ. महेश पवार (९९६०४९१८५०) डॉ.संदीप चव्हाण (९०४९६३४५००) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. एखाद्या व्यक्तीला त्रास झाल्यास संबंधित डॉक्टर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा. ग्रामपंचायत कर्मचारी सचिन धस्के (८४५९५८७६०२), संतोष जाधव (९७६७५८२७६६ ) या दोहोंवर मशीन देवाण-घेवाणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तरी गरजुनी या विनामूल्य सेवेचा लाभ घ्यावा. आपल्या आप्तस्वकीयांचे प्राण वाचवावेत. गावच्या विकासात ग्रामस्थांचे सहकार्य असते. आपण कामाशिवाय बाहेर पडू नका, सुरक्षित राहा. आपण सर्वजण कोरोनाला हरवूया, गावाला विकासाच्या मार्गावर नेऊया.
शब्दांकन : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा