!! राजस्थान कल्चरल मॅरेथॉन !! Virtual Marathon (४ ऑक्टोबर )
आज रविवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२० रोजी राजस्थान कल्चरल मरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मी २१ कि. मी. (हाफ मॅरेथॉन ) मध्ये भाग घेतला होता. आज मी नेहमीचाच रुट निवडला. स्पर्धेची सुरुवात वर्णे हायस्कूल पासून झाली. वर्णे- अपशिंगे- नागठाणे- नागठाणे पेट्रोल पंप- परत वर्णे हायकूल असा स्पर्धेचा मार्ग होता. आज मी हे अंतर १:५७:५५ (एक तास,सत्तावन मिनिटे आणि पंचावन्न सेकंदात ) पूर्ण केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दादासाहेब सुतार (वर्णे), राजू शिंगाडे (अपशिंगे ) यांचे सहकार्य लाभले. राजू शिंगाडे माझेबरोबर ५ कि. मी.धावले. आपणा सर्वांच्या सदिच्छा पाठीशी असल्यामुळे मला हे शक्य झाले असे वाटते.
कोरोनाने अनेक मॅरेथॉन आभासी (virtually ) पद्धतीने घेतल्या जात आहेत. त्यामुळे आपण आपल्या ठिकाणी यामध्ये सहभागी होऊ शकतो. यामध्ये अनेक मॅरेथॉनमध्ये आपण मोफतही सहभागी होऊ शकता. चला तर आपण अशा मरेथॉनमध्ये सहभागी होऊया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
मनपूर्वक अभिनंदन
उत्तर द्याहटवा