!! भूमिपूजन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन लोकार्पण समारंभ !!
आज २२ सप्टेंबर यादिवशी १४ व्या वित्तआयोगातून मंजूर झालेल्या कामाचा भूमिपूजन समारंभ सामाजिक अंतर पाळून गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. रसिका काळंगे व उपसरपंच अशोक भोसले यांच्या हस्ते व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मंजूर कामामध्ये ग्रामपंचायत ते आबापुरी फाटा रस्ता काँक्रीटीकरण अंतर ३५० मीटर, त्याचबरोबर स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक बसवणे आदी कामाचा समावेशआहे.
सध्या सातारा जिल्ह्यात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. त्याला प्रतिबंध करणे गरजेचे आहे. आपल्या गावातील लोकांचे ऑक्सिजनअभावी बळी जात आहेत. वेळेत उपचार मिळत नाहीत.ग्रामस्थांची अडचण विचारात घेऊन महेश आनंदराव चव्हाण (दयानंद चव्हाण -मिस्त्री) यांच्या बंधूनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन ग्रामपंचायतीस भेट दिली.या मशीनचा स्वीकार प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वर्णे येथील आरोग्य सेवक सुधाकर बोधे यांनी केला. सदरची मशीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात असणार आहे. यापुढे कोणाला श्वसनाचा त्रास जाणवला तर आपण डॉ.बोधे यांच्याशी संपर्क साधावा. ही सेवा विनामूल्य आहे.
आजच्या दिवशी काँक्रीटीकरण रस्ता, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक, बौद्ध वस्तीत गटर बांधकाम आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या सर्व कामामुळे गावच्या वैभवात निश्चितच भर पडणार आहे असे वाटते.
शब्दांकन : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा