!! दावचवाडी-- निफाड भेट!!
महाराष्ट्रात नाशिक जिल्हा द्राक्षशेतीसाठी प्रसिध्द आहे. त्यामध्ये निफाड तालुका हे तर द्राक्षाचे हब आहे. याच तालुक्यातील दावचवाडी येथील माझे परममित्र हिरामण कुयटे यांचेकडे पारायण सोहळ्याच्या निमित्ताने भेट देण्याचा योग आला. माझे समवेत वर्णे येथील अरुण कुंभार होते.
हे कुटुंब स्वाध्याय परिवाराशी निगडित होते. साहजिकच घरातील वातावरण पूर्ण आध्यात्मिक होते.रात्री आम्ही स्वाध्याय परिवारातील संबंधित असणारे भालचंद्र कुयटे,सचिन तेलंगे,रविंद्र शिंदे,रावसाहेब जाधव,दिपक कुयटे यांच्याबरोबर स्वाध्याय परिवार यांचे कामाविषयी चर्चा केली. परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.त्यानिमित्ताने स्वाध्याय परिवार अनेक उपक्रम या वर्षभरात राबवत आहे. समाजात मोठ्या प्रमाणात आर्थिक तसेच सामाजिक विषमता आहे. ही विषमता कमी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत उपस्थितानी मांडले. बदलाची सुरुवात स्वतःपासून होणे आवश्यक आहे हेच चर्चेतून दिसून आले.यापूर्वी या सर्वांनी वर्णे येथे आमचे घरी भेट दिली होती. समाज व्यसनमुक्त झाला पाहिजे यादृष्टीने आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवा असेही त्यांनी सांगितले.
निफाड तालुका द्राक्ष पिकासाठी प्रसिध्द आहे. चर्चेतून द्राक्षशेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत माहिती मिळाली. येथील द्राक्षे निर्यात होतात. त्यामुळे आपल्या देशाला परकीय चलन मिळते. ज्या द्राक्षाची निर्यात होत नाही ती स्थानिक बाजारपेठेत विकली जातात. बेदाणे तयार करण्याची युनिट मोठ्या प्रमाणावर दिसुन आली. द्राक्ष शेतीमध्ये प्रत्येक काम वेळच्यावेळी होणे आवश्यक आहे. द्राक्ष लागवड,छाटणी,औषधफवारणी,निर्यातीसंबंधीचे निकष,प्री-कुलिंग,बेदाणे निर्मिती,विपणन संबंधीची माहिती त्यांचेकडून मिळाली.
निफाड भेटीतून द्राक्ष शेतीविषयक माहिती तर मिळालीच त्याचबरोबर व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी तरुणांचे योगदान किती महत्वपूर्ण आहे हेही समजले. आपणही आधुनिक शेती तसेच व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करुया असे वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा