सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

!! त्र्यंबकेश्वर पारायण सोहळा !! (३)

!! त्र्यंबकेश्वर पारायण सोहळा !! (३)


          आज ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन होते.कीर्तन सेवेसाठी संत निळोबाराय यांचा अभंग घेतला होता. तो खालीलप्रमाणे--
हरिभक्त माझे जिवलग सांगाती! संभाळुनी नेती परलोका! वचनेची त्यांच्या होय महालाभ!१!
करी पदमनाभ कृपादृष्टी!२ !
मोहादी बंधने जाती तुटोनिया!कळीकाळ पायातळी दंडे!३!
निळा म्हणे मुक्त मोकळीया वाटा! जावया वैकुंठा त्यांच्या संगे !४!
         पुणे जिल्ह्यात तीन संतांचा जन्म झाला त्यामध्ये शिरुर येथे निळोबाराय यांचा,आळंदी येथे ज्ञानेश्वर यांचा,देहू येथे  तुकाराम महाराजांचा.
           शिरुरमध्ये रामलिंग हे पवित्र स्थान आहे. प्रभू रामचंद्र व लक्ष्मण रोज आपल्या प्रवासात वाळूचे शिवलिंग तयार करायचे व संध्याकाळी विसर्जन करायचे मात्र शिरुर येथील शिवलिंग विसर्जन करायचे राहुन गेले. निळोबाराय यांच्या वडिलांनी पुत्र प्राप्तीसाठी भगवान शंकर यांचेकडे वर मागितला. शंकराच्या कृपाप्रसादाने पुत्रप्राप्ती झाल्याने निळोबा हे नामाभिधान केले.तुकोबांच्या वैकुंठ गमनानंतर २६ वर्षांनी निळोबाराय यांचा जन्म सन १६७५  मध्ये झाला होता. पूर्वीच्या पध्दतीनुसार त्यांचा विवाह लवकर झाला. वडिलांना  त्यांच्या कामात मदत करु लागले. कुलकर्णी पदाचे व्यवहार सांभाळू लागले पण त्यांचा  पारमार्थिक जीवनाकडे जास्त ओढा होता.पूर्वी कुलकर्णी गावचा सारा गोळा करत. परिस्थिती बरी होती पण लोकांना हेच आवडत नव्हते. लोकांचा त्रास नको म्हणून काही दिवसांनी कुलकर्णी पदातून  स्वतःहून मुक्त झाले. आपल्या जीवनात ग्रामस्थांचा उपद्रव नको म्हणून त्यांनी गाव सोडले. आपली संपत्ती घरदार दान करुन १७०६ साली शिरुर सोडले.आणि आपली पत्नी मैनाबाईला घेऊन त्यांनी पारनेर गाठले.
             संत तुकोबाराय यांच्याबद्दल त्यांना प्रचंड आसक्ती होती.तुकाराम महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे यासाठी त्यांनी अनुष्ठान केले आणि ४२ व्या दिवशी प्रत्यक्ष तुकोबाराय यांचे दर्शन झाले. तुकोबारायांनी  त्यांना रामकृष्णहरी हा मंत्र दिला. भक्तीचा  प्रचार आणि प्रसार करण्याचे काम त्यांचेवर सोपवले.
            पिंपळनेर येथे ते थांबले.१७५३ मध्ये ते समाधीस्थ झाले. त्यांच्या प्रत्येक कार्यात पांडुरंगाने साह्य केल्याचे अनेक दाखल्यातून दिसुन येते. आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले तर आपणास कोणतीही अडचण येत नाही. आपले मित्र अर्ध्यावर सोडणारे नकोत त्यांनी शेवटपर्यंत साथ द्यायला हवी.खरंतर संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र. आपण मोहपाशात किती अडकायचे हे ज्याने त्याने ठरवायचे.
         थोडक्यात आपण आपले काम प्रामाणिकपणे केले तर आपणास इतरांचे साह्य होते.आपण आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे करुया हाच संदेश मिळतो.
         शब्दांकन -- राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...