सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

!! त्रंबकेश्वर पारायण सोहळा !! (२)

!! त्रंबकेश्वर पारायण सोहळा !! (२)
       
         आज कीर्तन सेवेसाठी ह.भ.प.एकनाथ महाराज सदगीर यांनी घेतलेला अभंग  संत सोयराबाई यांचा होता. त्या चोखोबांच्या पत्नी होत्या.७०० वर्षांपूर्वी शिक्षणाची कोणतीही सुविधा नसताना त्यांनी केलेले कार्य फारच महनीय होते. त्याकाळी शिक्षणाची संधी ब्राह्मण वर्गाशिवाय अन्य कोणालाही नव्हती. स्त्री शिक्षणाचा तर प्रश्नच नव्हता. सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळेच शिक्षणाची संधी सर्वसामान्यांना उपलब्ध झाली.
 कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग खालीलप्रमाणे--
   "अवघा रंग एक झाला! रंगी रंगला श्रीरंग!
  सर्व  संतांनी समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. आपण आपला अहंकार सोडून दिल्यानंतरच समाजाची उत्तम सेवा करु शकतो. दोन तलवारी एका म्यानात राहू शकत नाहीत तदवत  कोणत्याही दोन अहंकारी व्यक्ती एकत्र राहू शकत नाहीत.
        पिंगळा, नंदिवाला,वासुदेव हे गोड बोलून आपले इप्सित साध्य करतात.नंदिवाला एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडे जातो. श्रीमंत व्यक्ति त्याचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तरीही आपल्या मधुर वाणीने आपला हेतू साध्य करतो.आपणही आपला हेतू साध्य करण्यासाठी डोक्यावर बर्फ,तोंडात साखरआणि पायाला भिंगरी लाऊन काम करायला हवे.
         संतामध्ये अनेक जातीधर्माचे साधुसंत होऊन गेले. संत नामदेव, चोखोबा,  नरहरी सोनार, कुंभार,सावता माळी, मीराबाई,जनाबाई,  बहिणाबाई, सोयराबाई, निवृत्तीनाथ, तुकाराम,ज्ञानेश्वर,भानुदास आदि संतांना पांडुरंगाने विविध रुपे घेऊ न साह्य केलेचे दिसुन येते.
    जरी विविध जातीधर्मातील संत असलेतरी समाजाची उन्नती करणे हाच मुख्य उद्देश होता. जातीयता नष्ट करणे,अस्पृश्यता निवारणात संतांचा वाटा मोठा आहे.
    आपणही समाजाच्या भल्यासाठी संतविचार
अंमलात आणायला हवे असे वाटते.
 शब्दांकन -- राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...