मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

!!त्रंबकेश्वर पारायण सोहळा !!(४)

!!त्रंबकेश्वर पारायण सोहळा !!(४)
             आजचे कीर्तन ह.भ. प. संजयनाना महाराज धोंडगे यांनी केले होते. त्यांनी किर्तनसेवेसाठी   बहिणाबाई महाराज  यांचा अभंग घेतला होता. तो खालीलप्रमाणे -
    संत कृपा झाली।इमारत फळा आली।१।
    ज्ञानदेवे रचिला पाया।उभारिले देवालया ।२।
    नाम तयाचा किंकर।तेणे केला विस्तार।३।
    जनार्धन एकनाथ।खांब दिला भागवत।४।
भजन करा सावकाश।तुका झालासे कळस।५।
 बहिणी म्हणे फडकती ध्वजा।निरुपण केले ओजा।६।

            बहिणाबाई या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. आजही या संतांच्याबद्दल कोणालाही फारसी माहिती नाही.लोकांना खानदेशातील कवयित्री बहिनाबाई चौधरी माहीत आहेत." अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर तेव्हा मिळते भाकर"  या गीतामुळे कवयित्री बहिणाबाई लोकांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत.
          संत बहिणाबाई या मराठवाड्यातील होत्या.त्यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात देवळा रंगारी येथे १७५१ मध्ये  झाला. वयाच्या अवघ्या तीसऱ्या वर्षीच ३० वर्षे वयाच्या रत्नाकर यांच्या बरोबर  त्यांचा विवाह झाला होता.  बालविवाह कधीही वाईटच.बालविवाह या वाईट प्रथेचा बहिनाबाईना  खूप त्रास झाला आहे. त्यांनी वयाच्या ५ व्या वर्षी पंढरपूरमध्ये,९व्या वर्षी शिखर शिंगणापूर येथे काही काळ वास्तव्य केले होते .नंतर रहिमतपूर येथे त्या काही काळ राहिल्या. यानंतर मात्र कोल्हापूर येथे बराच काळ वास्तव्य केले होते. तिथेच त्यांच्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली. कोल्हापूरमध्ये रामदासस्वामीचे शिष्य जयरामस्वामी कीर्तन करत. त्या कीर्तनाला बहिणाबाई नेहमी जात असत. त्या उत्तम गो-सेवक होत्या. त्यांनी भजनाची परंपरा जपली. त्यांनी ७४० अभंगाची रचना केली. वयाच्या ७२ व्या  वर्षी त्यांचे निधन झाले.
           मानवी जीवन दुःखाचे मूळ तर संत जीवन म्हणजे सुख असे संबोधले जाते.कोणताही संकल्प आणि परिपूर्ती यामध्ये फारसे अंतर असणे योग्य नाही. बऱ्याचवेळा आपण संकल्प करतो पण त्याच्यापूर्तीसाठी आवश्यक परिश्रम घेत नाही.
           आपण आपल्या कुवतीनुसार संकल्प करावा व त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करावा हाच संदेश आज मिळाला.
    शब्दांकन -- राजेंद्र पवार
             ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...