!! त्रंबकेश्वर येथील पारायण सोहळा !!
श्री बारा जोतिर्लिंग गाथा पारायनाच्या समारोपीय महोत्सवानिमित्त त्रंबकेश्वर येथे शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला.आजची किर्तनसेवा अनिल महाराज पाटील यांनी केली होती.आज कीर्तन सेवेसाठी संत सेना महाराजांचा अभंग त्यांनी घेतला होता.
कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग खालील प्रमाणे --
"संत संगतीने थोर लाभ झाला!मोह निरसला मायादीक ! घातले बाहेरी काम क्रोध वैरी!बैसला अंतरी पांडुरंग !" या अभंगाचे विवेचन सुंदररित्या केले.संगतीने माणसाची प्रगती अगर अधोगती होती.म्हणून सत्संग महत्वाचा आहे.मोह मत्सरापासून दूर राहता आले पाहिजे.श्वानाला दुसऱ्याची गती,माणसाला दुसऱ्याची प्रगती,संतांना दुसऱ्याची अधोगती आवडत नाही.मायेचे आकर्षण नष्ट झाले पाहिजे. भ्रम व खोटेपणा पटवून देण्याचे काम संत करतात.
संत सेना महाराजांनी आपले आयुष्य व्यसनमुक्तीसाठी व्यथित केले होते. संत सेना महाराज निष्काम कर्मयोगी होते. आपले काम करताना मुखात परमेश्वराचे नाम असले पाहिजे. थोडक्यात कामाला प्राधान्य द्यायला हवे.(Work is Worship ),काम करता करता भक्ती रुजवण्याचे काम त्यांनी केले.
आजच्या कीर्तनातून प्रथम कामाला प्राधान्य द्या, काम करत असताना परमेश्वराचे नामस्मरण करा हाच संदेश मिळाला.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा