!! शाहिद अशोक कामटे जन्मदिन !!
( २३ फेब्रुवारी )
अशोक कामटे जन्म २३ फेब्रुवारी १९६५ मृत्यू २६ नोव्हेंबर २००८ हे मुंबईचे अॅडिशनल पोलिस कमिशनर होते. त्यांचा जन्म एका मराठा कुटुंबात २३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये झाले. पुढे ५ वर्षांसाठी ते कोडाईकॅनाल आंतरराष्ट्रीय प्रशालेत दाखल झाले होते. त्यांना कॅम्प रायझिंगसनमधून आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली व ते १९८२ मध्ये उत्तीर्ण झाले. त्यांनी १९८५ मध्ये सेंट झेवियर महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली .त्यांनी त्यांचे पदवीनंतरचे शिक्षण सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून १९८७ साली पूर्ण केले. त्यांनी भारताचे पेरू मध्ये झालेल्या junior power lifting championship मध्ये प्रतिनिधित्व केले होते. अशोक कामटे यांच्या पश्चात पत्नी विनिता, मुले राहुल व अर्जुन आहेत. त्यांचे वडील एम.आर. कामटे भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी होते. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. त्यांच्याबरोबर विजय साळस्कर, हेमंत करकरे, मेजर संदीप ऊनीकृष्णन, तुकाराम ओंबळे हेही शहीद झाले होते.
अशोक कामटे सातारा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक होते. सांगली येथे त्यांच्या नावाने दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. ती स्पर्धा आजच आहे. गतवर्षी मीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. भुईंज येथील किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना येथे भव्य शहीद स्मारक उभारले आहे. याठिकाणी आपण प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे. अशोक कामटे तसेच सर्वच शहिदाप्रति आदर व्यक्त करुया. सर्वच शहिदांना विनम्र अभिवादन.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा