शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

!! नाशिक सहल !! १ प्रवास वर्णन

!! नाशिक सहल !!
         शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्ताने त्रंबकेश्वर येथे  गेलो होतो. सकाळी सकाळी कुशावर्त येथे स्नान करुन निवृत्तीनाथ समाधी मंदिरात दर्शन घेतले. लगेचच साईटसीन पाहण्यासाठी बाहेर पडलो.सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी आम्ही गेलो.त्रंबकेश्वर ते सप्तश्रृंगीगड हे ११० कि. मी. अंतर आहे. सप्तश्रृंगी गडावर जाण्यासाठी १० कि.मी.चा घाटातून प्रवास करावा लागतो.
        देवीच्या दर्शनासाठी रोपवेची सोय आहे. अगदी अल्पवेळात गडावर जाता येता येते.
      सप्तश्रृंगी गडाविषयी--
     सप्तश्रृंगी गड नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात नांदुरी येथे आहे. भारतात  विशेषतः मराठा व भिल्ल जमातीचे लोक या देवीची पूजा करतात. काहीजण तर  तिची कुलदैवत म्हणून उपासना करतात.महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी हे एक मंदिर आहे. हे शक्तीपीठ अर्धे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते.
           नंतर श्री स्वामी समर्थ सेवा( दिंडोरी प्रणित) येथील अध्यात्मिक केंद्रास भेट दिली.आपल्या जीवनात संस्काराला खूपच महत्व आहे. या समर्थ सेवा केंद्रात, बालसंस्कार व युवा प्रबोधन, विवाह संस्कार,आरोग्य व आयर्वेद, कृषिशास्त्र,भारतीय संस्कृती, कायदेविषयक सल्ला,वास्तुशास्त्र, प्रशिक्षण, पर्यावरण, पशु व गोवंश,माहिती तंत्रज्ञान असे विभाग आहेत. या विभागाच्या माध्यमातून येथे सेवा केली जाते.विचारी माणसाने दिवसा असे कर्म करावे कि, त्याला रात्री सुखाने झोप येईल व तरुणपणात  असे कर्म करावे कि, म्हातारपणात सुख मिळेल आणि जन्मभरात असे कर्म करावे कि ,परलोकात देखील सुख मिळेल - प.पू. गुरुमाऊली असा बोर्ड वाचनात आला की जो खूपच विचारकरण्याजोगा आहे.
         नाशिक शहरात रामकुंड यास्थळाला भेट दिली.नाशिक शहरात राज्यस्थरावरील पोलीस अकादमी,आरोग्य विज्ञान विद्यापीठ या संस्थाचे
फलक दिसून आले. त्रंबकेश्वरच्या परतीच्या मार्गाला अंजनेरी पर्वत आहे. या पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला होता ,तेथे हनुमानाचे भव्य मंदिर आहे तेही पाहता आले.
   आजच्या दिवसात काही धार्मिक स्थळे,काही सेवा केंद्रे पाहता आली यामधून आपण अध्यात्माचा वारसा जतन करायला हवा, जनतेची सेवा करायला हवी,नवनवीन प्रशिक्षणे घ्यायला हवीत हाच संदेश मिळतो.
     शब्दांकन -- राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...