बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

औषधी व सुगंधी वनस्पती कार्यशाळा, वर्णे

औषधी व सुगंधी वनस्पती कार्यशाळा, वर्णे
  शेतकऱ्याच्या आर्थिक समृध्दीसाठी
   जिरेनियम लागवड फायद्याची -- डॉ .महेंद्र
     दारोकर
    शेतकऱ्यांच्या उत्पन्नात हमखास वाढ होणेसाठी जिरेनियम या सुगंधी वनस्पतीची लागवड करणे फायदेशीर असल्याचे मत लखनौ येथील औषधी व सुगंधी वनस्पती संशोधन केंद्रातील संशोधक  डॉ. महेंद्र दारोकर  यांनी वर्णे  येथे आयोजित केलेल्या
 कार्यशाळेत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की,जिरेनियम लागवड करणेसाठी शेतकऱ्यांनी आपली रोपे स्वतःच तयार करावीत. पिकाची लागवड  करण्यासाठी एक वर्षभर अगोदर तयारी करणे गरजेचे आहे.आपणास लागणारे मदर प्लॅन्टस सीमॅप ही संशोधन संस्था मोफत पुरवेल त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही.आपण कोणत्याही मध्यस्थाच्या आमिषाला बळी पडू नका. या पिकासाठी लागणारी सर्व माहिती लागवड ते प्रक्रिया आपणास पुरवण्यात येईल.
          डॉ. राजेश वर्मा म्हणाले की, हे पीक महाराष्ट्राच्या हवामानात येऊ शकते.त्यांनी पिकाची लागवड शक्यतो बेडवर करावी.  गांडूळ खत,कंपोस्ट खताचा अधिक वापर करावा. पहिली कापणी १४० दिवसात घ्यावी. नंतरच्या कापन्या १०० दिवसांनी घ्याव्यात. कापणी योग्यवेळी झाली नाही तर तेलाच्या गुणवत्तेत फरक पडू शकतो आणि त्याचा परिणाम किंमतीवर होऊ शकतो. पावसाळ्यात हे पीक घेता येत नाही. रोपे वाचवण्यासाठी संरक्षित जागेची गरज आहे.
    डॉ.आश्विन ननावरे यांनी तेल काढण्याच्या विविध पध्दती बाबतची सविस्तर माहिती सांगितली.डॉ. संतोष केदार यांनी चलचित्राच्या
 माध्यमातून पिकाच्या लागवड ते कापणी पर्यंतच्या विविध अवस्थाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
          कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे विषय विशेषज्ञ डॉ. भूषण यादगीरवार यांनी औषधी व सुगंधी वनस्पतीबाबत सातारा जिल्ह्यातील स्थितीचा ऊहापोह केला. सातारा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील तंत्र अधिकारी
 अतुल महामुलकर यांनी औषधी व सुगंधी वनस्पतीची लागवडीची वाढ होण्यासाठी शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ३० ते ७०% पर्यंत सवलत देत असल्याचे सांगितले. गटाच्या माध्यमातून पीक लागवड केली तर त्याला अधिक मदत शासन स्तरावरुन पुरवली जाईल.
       वर्णे येथील प्रगतशील शेतकरी अजित दादासाहेब पवार यांनी आपल्या शेतावर सुगंधी वनस्पतीची  कार्यशाळा आयोजित करुन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केल्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांनी आपल्या मनोगतात समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांनी ऊस शेतीबरोबरच औषधी व सुगंधी वनस्पतीकडे वळण्याचे आवाहन केले.
             कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र पवार यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत अजित पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीकांत घोरपडे यांनी केले.
             या कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून शेतकरी प्रतिनिधीसह  वर्णे पंचक्रोशीतील अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजित दादासाहेब पवार यांच्या मित्रसमूहातील सर्वच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या पिकाबाबत अधिक माहिती हवी असेल तर संबंधितानी अजित दादासाहेब पवार ७७२२०३५१११ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
        आजच्या कार्यक्रमातून शेतकऱ्यांनी औषधी व  सुगंधी वनस्पतीची लागवड गटशेतीच्या  माध्यमात करुन आर्थिक वृध्दी करण्याचा संदेश मिळाला.
      शब्दांकन -- राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...