!! राजस्थान सहल - प्रवास वर्णन !! (१० )
आज ५ डिसेंबर, आमच्या सहलीचा शेवटचा दिवस, आमचा मुक्काम माऊंट अबु येथील हॉटेल रवी रंजन येथे होता. हॉटेलपासुन पोलो मैदान जवळ असल्याने सकाळी मॉर्निंग वॉकचादेखील सुखद अनुभव आम्ही घेतला. सकाळी ९ वाजताच फिरण्यासाठी बाहेर पडलो. साईटसीन पाहण्यासाठी आपणास जीपसारख्या छोट्या वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
माऊंट अबु हे राजस्थानमधील प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे. प्रथम आम्ही प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे भेट दिली. या विश्वविद्यालयाची स्थापना १९३० साली दादा लेखराजजी यांनी केली. त्यांनाच आपण प्रजापिता ब्रम्हा म्हणून ओळखतो. हे जीवन धकाधकीचे आहे,मानवाला शांततेची गरज असल्याने तो या संस्थेकडे वळला आहे. आम्हाला याठिकाणी मानवाने अहंकारविरहित वागावे. आपण सकारात्मक विचार सरणीचा स्वीकार करायला हवा असे विविध उदाहरणे देऊन सांगण्यात आले.
विश्वविद्यालयाच्या भेटीनंतर आम्ही सोमनाथ महादेव मंदिरास भेट दिली. मंदिर सुंदर आहेच, तेथे त्रिमिती चित्रांचा सुरेख वापर केला आहे. या मंदिराशेजारी छोटे तळे आहे तेथे आपणास रंगीत मासे पहावयास मिळतात.
याठिकाणापासून साधारण १५ कि. मी. अंतरावर दत्ताचे स्थान असणारे गुरुशिखर मंदिर आहे. हे राजस्थानमधील सर्वात जास्त उंचीचे ठिकाण आहे. येथील मंदिरात जाण्यासाठी जवळपास सातशे पायऱ्या आहेत. ज्यांना चालत जाणे अशक्य आहे त्यांच्यासाठी डोलीची सोय आहे. काही लोक त्याचाही आधार घेतात.
याच मार्गावर जैन मंदिर आहे. हे मंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराला भेट दिल्यानंतर आम्ही पुन्हा हॉटेलवर पोहोचलो. भोजनाचा आस्वाद घेऊन अगदी जवळ असणाऱ्या मार्केटमध्ये फेरफटका मारला. काही खरेदी केली. येथील मार्केटसुध्दा भव्य आहे. येथे कलाकुसरीच्या विविध वस्तु पहायला मिळतात.
आजच्या भेटीत वास्तुकला, विविध प्रकारची शिल्पे पहायला मिळाली. ही कला जिवंत राहणे तसेच जगभरात तिचा प्रसार करणे हे आपले कर्तव्य आहे असे मला वाटते.
प्रवासवर्णन-- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

👌👌👌
उत्तर द्याहटवा