बुधवार, ११ डिसेंबर, २०१९

!! के. व्ही. के.बोरगावची फूल संशोधन केंद्रास भेट !!

!!  के. व्ही. के.बोरगावची फूल संशोधन केंद्रास भेट  !!
     पुणे येथील पुष्पविज्ञान संशोधन केंद्रास  फौंडेशनडेच्या  निमित्ताने सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र बोरगावच्या साह्याने भेट दिली.या टीमचे नेतृत्व के. व्ही. के. बोरगावचे विषय विशेषज्ञ डॉ. भूषण यादगीरवार यांनी केले होते.
          सदरच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कापूस संशोधन केंद्र मुंबईचे  डायरेक्टर डॉ. पी. जी. पाटील,राजगुरूनगर येथील कांदा-लसूण केंद्राचे डायरेक्टर डॉ.मेजर सिंग,पुणे येथील द्राक्ष संशोधन केंद्राच्या डायरेक्टर डॉ.अनुराधा उपाध्याय, फूल संशोधन केंद्राचे डॉ.के.व्ही. प्रसाद आदि उपस्थित होते.
        या पुष्पविज्ञान संस्थेची स्थापना २००९ मध्ये दिल्ली येथे करण्यात आली.२०१४ मध्ये या संस्थेचे स्थलांतर पुणे येथे झाले. केशवनगर,मुंढवा येथे संस्थेस ५० एकर जमीन मिळालेली आहे. येथे विविध प्रकारच्या फ़ुलांवर संशोधन चालते. सातारा जिल्ह्याला हे संशोधन केंद्र जवळ असल्याने त्याचा आपणास खूपच फायदा होणार आहे.
           डॉ.पी.जी.पाटील म्हणाले की, आपल्या देशात फूल उत्पादनाला खूप मोठा वाव आहे. आपण फक्त ७०० कोटींची फुलं निर्यात करतो. नेदरलँडमध्ये फुलांचं जागतिक स्तरावरील मार्केट आहे.१२६ एकरावर स्ट्रक्चर
आहे.येथून सर्व जगाचा व्यापार चालतो. पुणे येथील फूल संशोधन केंद्रामध्ये आपल्या सर्व समस्यांचे निराकरण होईल आपण या केंद्राच्या संपर्कात रहा आणि आपले उत्पादन वाढवा.फूल निर्यातीच्या माध्यमातून परकीय चलन आपल्या देशात येऊद्या अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
        डॉ.मेजर सिंग म्हणाले की, आपण चांगल्या गोष्टी समाजात रुजवल्या पाहिजेत. कोणत्याही कार्यक्रमाला पुष्पगुच्छ घेऊन गेले पाहिजे.अशा सवयी समाजात रुजल्यातर आपल्या फुलांचे मार्केट वाढणार आहे.
         पुष्पविज्ञान संस्थेचे डायरेक्टर  डॉ. के.व्ही. प्रसाद यांनी संस्था वाटचालीची सर्व माहिती सविस्तर दिली. ही संस्था पुणे येथे आणण्यासाठी मा. शरद पवारसाहेब यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले.
       यावेळी प्रत्यक्ष फिल्ड व्हीजिट करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जागेवर जाणुन घेतल्या. या कार्यक्रमात पुणे, अहमदनगर, सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  व पाहुण्यांचे स्वागत  या केंद्राचे डायरेक्टर डॉ.के.व्ही. प्रसाद यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.तारक नाथ शहा यांनी केले.
          सदरच्या कार्यक्रमानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला शेतकऱ्यांनी भेट दिली. तेथे जनसंपर्क अधिकारी श्री .भोईटेसाहेब,वरिष्ठ शास्त्रज्ञ ज्ञानेश्वर पवार,विकास पवार यांनी ऊस शेती संदर्भात सविस्तर माहिती दिली. ऊस पीक घेताना पूर्व मशागत,माती परीक्षण, चांगल्या बेण्याची निवड,ठिबकद्वारे पाणी,शिफारशीनुसार खत मात्रा या बाबी आवश्यक आहेत. आपण योग्य काळजी घेतली तर आपले उत्पादन शंभर टनापेक्षा अधिक मिळण्यास काहीच अडचण नाही.
       या भेटीतून फुल उत्पादन, ऊस उत्पादन वाढीस मदत होईल असे मला वाटते.
     शब्दांकन -- राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...