!! मराठा बिझनेस फोरम !!
सुसंवाद, स्वयंशिस्त आणि वचनबद्दता ही यशस्वी व्यवसायाची त्रिसूत्री -- सुरेंद्र काकडे
सातारा सिटी बिझनेस सेंटर येथे मराठा बिझनेस फोरमच्या वतीने व्यावसायिक,उद्योजकासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आयुरग्राम विकास ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र काकडे म्हणाले की,कोणत्याही व्यवसायात आपणास यशस्वी व्हावयाचे असेल तर आपण स्वयंशिस्त, सुसंवाद व वचनबद्धता या त्रिसूत्रीचा अवलंब करावयास हवा .
ते पुढे म्हणाले की, शेतकरी विविध भूमिका वेगवेगळ्या वेळी वटवत असतो. तो अन्नदाता,व्यापारी,उद्योजक,योद्धा अशा भूमिकेतून देशसेवा करत असतो. शेतकरी समाजात समन्वयाची भूमिका नसल्याने अपेक्षित प्रगती होऊ शकली नाही ही वस्तुस्थिती आहे .राजकर्त्यांनी देखील त्यांना लाचार बनवले आहे, त्यामुळे परिस्थितीविरुद्ध लढण्याचा आत्मविश्वास ते हरवून बसले आहेत.शेतकऱ्यांमधील स्वाभिमान जागृत करुन आपणास त्यांना लढवयास शिकवायचे आहे. चला आपण संघटित होऊया. आपल्या समाजबांधवाना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी बालाजी मोबाईलचे संतोष शेडगे म्हणाले की, आपण नेहमी बाजारपेठ विचारात घेऊन वाटचाल करावयास हवी. मी यशस्वी होणारच अशा विचाराने आपण बाजारपेठेत पाऊल टाकले पाहिजे. जीवन कापले म्हणाले की, मराठा समाजाची अस्मिता जपणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. मराठा समाजाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वजण एक होऊया.
यावेळी बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर ,भूषण डेरे,राजेंद्र पवार यांचेसह अनेक व्यावसायिकानी आपले विचार मांडले.कार्यक्रयाचे प्रास्ताविक जगदीश शिर्के यांनी केले तर सूत्रसंचालन तसेच आभार राजेंद्र साबळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक, उद्योजक बहुसंख्येने उपस्थित होते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा