रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

!!  सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉन  !!
         आज सातारा कास हेरिटेज हिल मरेथॉनची (5th Sunday Practice Run) आयोजित करण्यात आली होती.आज धावपट्टूना मार्गदर्शन करण्यासाठी आहारतज्ज्ञ डॉ. विजया कदम आलेल्या होत्या. आपल्या आरोग्यासाठी आहाराला अनन्य साधारण महत्व आहे. धावपट्टूनी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आहारामुळेच आपणास कार्य करण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा मिळते.आपण सेवन केलेल्या अन्नातून आपल्या गुणवत्तेची उच्चतम पातळी गाठता येते. आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठीही  मदत होते. नुसतेच अन्न महत्वाचे नाहीतर ते सेवन करण्याच्या वेळादेखील महत्वाच्या आहेत.प्रत्येक धावपट्टूला त्याच्या लक्षांकानुसार  वेगवेगळ्या आहाराची गरज असते.(उदा.१०कि. मी.२१ कि.मी.,४२ कि. मी.) धावपट्टूनी किमान सहा वेळा आपल्या आवश्यकतेनुसार आहार घ्यावा अर्थात शरीराला आहाराची गरज भासणे महत्वाचे आहे.भोजन करतानादेखील आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जसे टी. व्ही. किंवा मोबाईल बघत बघत जेवू नये.भोजन आपले मन शांत करते. मन शांत असेल तरच आपण खेळात प्राविण्य दाखवू शकतो.जसा आहार तसेच पाणी पिण्याचे महत्व त्यांनी याप्रसंगी सांगितले.मॅरेथॉनचा विचार करावयाचा झाला तर दोन तासापूर्वी चारशे ते सहाशे मि. ली.,तासापूर्वी तीनशे मि. ली. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक ग्लासभर पाणी प्यावे. स्पर्धा संपल्यावर एक लिटर पाणी प्यायला हवे. योग्य आहार आणि व्यायामामुळे वजन कमी होते. नुसता आहार कमी करुन वजन कमी करण्याचा प्रयत्न करु नये. दिक्षित यांचा आहारविषयक सल्ला प्री-डायबेटिक पेशंटसाठी चांगला आहे.
              आज २१ कि. मी. मध्ये भाग घेतलेल्यासाठी-१८ कि. मी.,१० कि. मी. मध्ये भाग घेतलेल्यासाठी ८ कि. मी.चा सराव घेण्यात आला. रुट सपोर्टसाठी ठिकठिकाणी इनर्जी फुडची व्यवस्था करण्यात आली होती.संस्थेचे अधिकृत  ट्रेनर शिव यादव  यांनी प्री व पोस्ट स्ट्रेचिंग उत्तमरित्या घेतले. आज मला स्पर्धा सुरु करण्यासाठी फ्लॅग ऑफची संधी दिली होती.
        कार्यक्रमाच्या सुरुवातीस संदीपभाऊ शिंदे यांनी स्पर्धा आयोजनाचा हेतू विशद केला. सर्वांचे स्वागत केले.आजच्या अल्पोपहाराची व्यवस्था डॉ. निलेश थोरात यांनी केली होती. त्यांनी याप्रसंगी क्रीडाप्रेमींसाठी आपल्या हॉस्पिटलच्या सवलत योजना जाहीर केल्या.
   कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. संतोष यादव, जयंत शिवदे, शरद भोसले, संदीप माने, सचिन धनावडे,संतोष भांबरे,राजेंद्र गायकवाड, पल्लवी नाईक, अल्पना शहा, दमयंती गीते, सौ. धनावडे यांनी परिश्रम घेतले.
         आजच्या कार्यक्रमातून आपली कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आहार कसा घ्यावा,किती वेळा घ्यावा,पाणी किती आणि कसे घ्यावे हे समजले. आपण सर्वजणच आहारविषयक चांगल्या सवयी अंगी बानवूया,आपले शरीर अधिक सुदृढ बनवूया.
          शब्दांकन -- राजेंद्र पवार
                ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...