!! सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉन !!
आज दिनांक २२ सप्टेंबर रोजी (3rd sunday practice run )चे आयोजन करण्यात आले होते. आज ज्यांनी २१ कि मी.मध्ये भाग घेतला होता त्यांच्यासाठी १५ कि. मी.चा सराव घेण्यात आला . स्पर्धेच्या मार्गावर ३ ठिकाणी इनर्जी फूडची व्यवस्था करण्यात आली होती. तर पोलीस करमणूक केंद्रात छान अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. आज तज्ञ मार्गदर्शक होते योग गुरु मा. प्रकाश देवर्षी सर .सरांनी व्यायामातील योगाचे महत्व सुंदररित्या सांगितले. प्राणायामामुळे आपले आंतरशरीर चांगले राहते तर प्राणायामाचा इफेक्ट २४ तास राहतो.ओमकार उच्चारही स्पर्धकाकडुन करुन घेतला.आपण दरवर्षी एकदा आपली आरोग्यतपासणी करुन घ्यावी त्यामुळे आपणास आपल्या व्याधी समजतात.
आरोग्याचे महत्व पटवून देत असताना त्यांनी १००००० या अंकाचा छान उपयोग करून घेतला. त्यातील १ अंक हा आपण आहोत. तर पुढील शुन्य हे आपले आईवडील, पती अगर पत्नी ,आणि मुले होत.या अंकातील १ बाजुला काढला तर पुढे केवळ शून्य राहतात. आपले अस्तित्व नसेल पुढील शून्याना काहीच अर्थ उरत नाही. थोडक्यात काय तर आपले आरोग्य व्यवस्थित असेल तरच बाकीच्या गोष्टींना अर्थ आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायामाची गरज आहे. आपण नियमितपणे योगा केला तर आपण अधिक कार्यक्षम राहु शकतो.
सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉनच्या माध्यमातून सातारा अधिक हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. संदीप शिंदे, डॉ. सुधीर पवार,संतोष यादव आणि त्यांची सर्व टिम या मॅरेथॉनसाठी प्रयत्नशील आहे. अजूनही वेळ गेलेली नाही ,आपण २१ कि. मी.१० कि. मी व ३ कि. मी.मध्ये भाग घेऊ शकता.सातारकरांसाठी तर विशेष सवलत योजना आहे. चला तर आपण या स्पर्धेत भाग घेऊया आणि अधिक आरोग्यसंपन्न होऊया.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा