शरीर स्वास्थ्यासाठी वृक्ष लागवड गरजेची -
सालविठ्ठल
किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी,के.व्ही. के.बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण अभियान व किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन बोरगाव येथे करण्यात आले होते यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी डी. डी. सालविठ्ठल म्हणाले की ,आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे.आपणास आवश्यक असणारा ऑक्सिजन वाढवणे व कार्बनडाय ऑक्साईड कमी करण्याचे महत्वाचे काम वृक्ष करत असतात. वृक्ष लागवड अधिक प्रमाणात होणेसाठी शासनाचे वतीने कन्या वनसमृद्धी योजना,रानमळा,कृषिवानिकी या योजना असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी वानिकी योजनेअंतर्गत झाड जगवणेसाठी प्रतीझाड ५००/-रुपये इतके अनुदान ३ वर्षात विभागून दिले जाते.
आपल्या देशात लोकसंख्येचा विचार करता वृक्षांचे प्रमाण खूपच कमी आहे. ते केवळ दरडोई २८ एवढे आहे आपणास ४०० वृक्षापर्यंत हे प्रमाण न्यावयाचे आहे. रशियासारख्या देशात हेच प्रमाण दरडोई४००० एवढे आहे. शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत हे प्रमाण आपणास वाढवायचे आहे. हा वृक्ष लागवड कार्यक्रम कृषिदिनापासून ३० सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्याबरोबर एन.जी. ओ. चे विशेष सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.
आजच्या कार्यक्रमासाठी इफको या खत निर्मिती करणाऱ्या संस्थेचे विशेष सहकार्य लाभले. या संस्थेच्या माध्यमातून कृषी व्यवसाय तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम चालत असल्याचे क्षेत्रीय अधिकारी संदीप रोकडे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, इफको ही सहकारी संस्था आहे हिच्या माध्यमातून खताची निर्मिती व विक्री केली जाते. ही विक्री जवळपास एकशे पंचवीस लाख टन असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या कंपनीच्या माध्यमातून खतावर एक लाखापर्यंतचा विमा उतरवला जातो.
पाणी फौंडेशनचे समन्वयक मोहन लाड म्हणाले की, आपण निसर्गाच्या जवळ जायला हवे. कोणतीही योजना यशस्वी होण्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा असतो. तो हेतू के. व्ही.के. च्या माध्यमातून साध्य होत असल्याचे प्रतिपादन ही त्यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी तंत्रविद्यालयाचे प्राचार्य तथा के. व्ही. के.चे समन्वयक मोहन शिर्के होते. त्यांनी विद्यालय तसेच के. व्ही. के.राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रती शेतकरी ५ लिंबाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.तसेच प्रा.भूषण यादगीरवार लिखित कागदी लिंबूचे फायदेशीर व्यवस्थापन या घडीपत्रिकेचेही वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विषय विशेषज्ञ डॉ. महेश बाबर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. सागर सकटे यांनी केले.कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी कृषी तंत्रविद्यालयाचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत सहभागी होऊन ही वसुंधरा अधिक हरित करण्याच्या मोहिमेत सहभागी होऊया.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा