!! सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉन !!
सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉन ही स्पर्धा १० नोव्हेंबर २०१९ रोजी संपन्न होणार आहे.ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संदीपभाऊ शिंदे आणि त्यांचा सर्व ग्रुप प्रयत्नशील आहे.आज दि.८ सप्टेंबर २०१९ या जागतिक साक्षरता दिनादिवशी (First Sunday Practice Run)घेण्यात आली. आज ५ कि. मी.चा सराव घेण्यात आला. सरावापूर्वी (warm up) घेण्यात आले. सरावाच्या मार्गावर दोन ठिकाणी इनर्जी फूडची,तसेच पाण्याची व्यवस्था केली होती.आज अतिशय आल्हाददायक वातावरणात ,रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत हा सराव पूर्ण झाला. सरावानंतर पोलीस करमणूक केंद्र याठिकाणी सर्वजण एकत्र आले. त्याठिकाणी ही मॅरेथॉन सुरु करण्यापाठीमागील हेतू आयोजकानी विशद केला. सातारा हिल मॅरेथॉन ही जगभरात नावाजलेली स्पर्धा आहे. या स्पर्धेत अनेकांना भाग घ्यायचा असतो परंतु सगळ्यांना संधी मिळेलच असे नाही. यावेळी तर केवळ ७२ तासातच सातारा हिल मॅरेथॉनचे बुकींग फुल झाले. भाग घेणाऱ्यांची संख्या हजारात आहे. त्यांची केवळ सोय व्हावी. साताऱ्यासारख्या निसर्गरम्य वातावरणात हिवाळ्यात धावता यावे यासाठी हा सगळा प्रपंच. सध्या साताऱ्याची ओळख 'रनर सिटी 'म्हणून होत आहे. सातारा कास हेरिटेज हिल मॅरेथॉन ही सातारा हिल मॅरेथॉनची" धाकटी बहीण "आहे. या भगिनीस आपल्या सहकार्याची गरज आहे.
यावेळी संदीपभाऊ शिंदे यांनी मी कसा घडलो. खेळाकडे कसा आकृष्ट झालो हे सविस्तर सांगितले. साताऱ्यातील ही स्पर्धा सुंदररित्या पार पडण्यासाठी आपणा सर्वांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. आजच्या प्रॅक्टिस रनमधील प्रमुख आकर्षण होते आयर्नमॅन डॉ.सुधीर पवार. सुधीर पवार यांनी मी आयर्नमॅन कसा झालो हे त्यांच्या खास शैलीत सांगितले. आयर्नमॅन होण्यासाठी आपणास स्वीमिंग, सायकलिंग, आणि रनींग या तीन प्रकारात भाग घ्यावा लागतो. या तीनही प्रकारातील प्रसंग ऐकल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांनी ही स्पर्धा १४ तास ११ मिनिटात पूर्ण केली. जगभरातील स्पर्धक या स्पर्धेत भाग घेतात. यानिमित्ताने आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मिळाली त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.
आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने व्यायाम करावयास हवा.अशा स्पर्धेत भाग घ्यावाव्यास हवा.आजूनदेखील आपण या स्पर्धेत भाग घेऊ शकता.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी.
WWW.skhhm.com
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.
8390500188
,9422600941
चलातर आपणही या स्पर्धेत भाग घेऊया आणि निरोगी राहुया. आपला सातारा अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी प्रयत्न करूया.
शब्दांकन - राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा