रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

!! सातारा हिल हाफ मॅरेथॉन  !!



        आज २५ ऑगस्ट २०१९ रोजी  सातारा हिल हाफ मॅरेथॉन संपन्न झाली.मी ६० ते ६९ या वयोगटात भाग घेतला होता.  मी ही स्पर्धा २तास १३ मिनिटे ५६ सेकंदात पूर्ण केली.ही स्पर्धा देशातील एक अवघड स्पर्धा आहे. या स्पर्धेचा प्रारंभ खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, शौर्यपदक विजेते सैनिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. स्पर्धेस प्रारंभ होण्यापूर्वी ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती. जनगणमन हे राष्ट्रगीत म्हणण्यात आले. "भारत माता की जय"या घोषणेने परिसर दणाणून गेला.
           या स्पर्धेचे घोषवाक्य "मैं भी सिपाही" असे होते. सीमेवर सैनिक तर राज्याराज्यात पोलीस दल कार्यरत असल्याने आपण सुखनैव  जीवन जगत असतो. आपण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलो तरी आपण देशाचे' सिपाही'आहोत.आपण आपले काम प्रामाणिक पणे करावे त्यावरच आपल्या देशाचा विकास अवलंबून असतो.
      या स्पर्धेत माझे मॅरेथॉनचे मार्गदर्शक साताऱ्यातील उद्योजक मा.श्रीकांत पवार व त्यांच्या कंपनीतील ४५ अधिकारी ,कर्मचारी सहभागी झाले होते. त्याचबरोबर माझे चिरंजीव डॉ.श्रीधर , डॉ.दिपक निकम , पुणे येथील पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. देवेंद्र जाधव , प्रशांत कणसे,संतोष कणसे यांचेसह सातारा येथील अनेकजण सहभागी झाले होते. अशा स्पर्धेतून आपणास आरोग्याचे महत्व कळते.
         निरोगी भारत झाला तरच आपली प्रगती होऊ शकते. चला तर आपला देश अधिक निरोगी बनवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करुया हाच संदेश सातारा हिल मॅरेथॉनमधुन घेऊन जाऊया.
Dear RAJENDRA PAWAR,
Congratulations for completing your Half Marathon at Satara Hill Half Marathon 2019 in 02:13:56 (provisional timing). For results log on to www.sportstimingsolutions.in post 3pm.

    शब्दांकन -- राजेंद्र पवार
              ९८५०७८११७८

५ टिप्पण्या:

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...