सोमवार, २६ ऑगस्ट, २०१९

           !!  मराठा बिझनेस फोरम  !!




       मराठा बिझनेस फोरम सातारा शाखाची मासिक सभा सातारा बिझनेस सेंटरच्या सभागृहात मा.श्रीधर कंग्राळकर यांचे अध्यक्षतेखाली दि.२६ ऑगस्ट २०१९ रोजी संपन्न झाली.सदरच्या सभेसाठी मराठी उद्योजक,व्यापारी उपस्थित होते. या सभेस  मासचे माजी अध्यक्ष  राजेश  कोरपे यांची  विशेष उपस्थिती होती.
          या सभेचा मुख्य उद्देश एकमेकांना भेटणे आणि आपला व्यवसाय वाढवणे असा आहे. या सभेमधून उद्योजकांची ओळख, व्यवसाय विस्तार, व्यवसाय मार्गदर्शन, नेतृत्व विकसन या बाबी घडत आहेत. या सभेत प्रामुख्याने सध्याच्या व्यवसाय, उद्योगातील स्थितीबाबत  चर्चा झाली. सध्या शासनाचे असणारे धोरण व्यवसाय , उद्योगासाठी फारसे अनुकूल नाही. लघुउद्योजकाना मोठ्या समस्येना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत आपणास टिकुन राहण्यासाठी  लोकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. तरुण उद्योजकाना अल्प व्याजदरात भांडवल उभारणी करुन दिली पाहिजे. भांडवल उभारणीच्या दृष्टीने सातारा शहरात प्रयत्न चालू आहेत. मराठा बिझनेस फोरम हे आपल्या अडचणी सोडवणं, आपणास मार्गदर्शन करणं यासाठी आहे हाच संदेश व्यावसायिक, उद्योजकात गेला पाहिजे असे मार्गदर्शन राजेश कोरपे यांनी केले. मराठा बिझनेस फोरमचे रजिस्ट्रेशन धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालयात न करता कंपनी ऍक्टखाली करावे असेही त्यांनी सांगितले.
        सध्या देशात मंदीचे सावट असल्याने चलन फिरते राहण्यासाठी प्रयत्नशिल राहुया. हा पैसा आपल्या माणसांच्या हातात कसा येईल यासाठी रोजगाराच्या संधी देखील आपल्या  माणसांना देऊया. वर्ककल्चरचे आव्हान आपणापुढे आहेच ती निर्मिती करणे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेल.
        सुरुवातीला प्रत्येकाने आपण करत असलेला व्यवसाय, उद्योग याची माहिती आपल्या ओळख परेडमधून  करुन दिली. आपल्या उद्योगाला शेती व्यवसायाची जोड दिली पाहिजे. शेतीशी निगडित उद्योग सुरेंद्र काकडे व डॉ.श्रीधर पवार करत आहेत त्यांनीदेखील आपल्या उद्योग, व्यवसायाची माहिती उपस्थिताना दिली.
        सुरुवातीला राजेश कोरपे यांचे स्वागत श्रीधर कंग्राळकर, डॉ.सतीश बर्गे, जगदीश शिर्के, सतीश काटे, सुरेंद्र काकडे यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  राजेंद्र साबळे यांनी केले तर आभार सुरेंद्र काकडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. चला तर आपण मराठा बिझनेस फोरमच्या माध्यमातून आपला व्यवसाय, उद्योग वाढवूया, आपल्या माणसांना सहकार्य करुया.
      शब्दांकन-- राजेंद्र पवार
             ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...