!!गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाचे निमित्ताने !!
!! पत्रकार गांधी !!
एकोणिसाव्या वर्षी इंग्लंडला पोहचल्यावर गांधीजी वृत्तपत्राचे नियमित वाचक बनले. २१ वर्षाचे असताना त्यांनी प्रथम "द व्हेजिटेरियन" या इंग्रजी साप्ताहिकात शाकाहार,भारतीय आहार पद्धती, सवयी आणि धार्मिक उत्सवाबद्दल लिहिले. गांधीजींनी कधीही लोकांवर छाप टाकण्यासाठी लिहिले नाही. त्यांचं ध्येय सत्याची सेवा करणं, लोकांना शिक्षण देणं आणि देशासाठी उपयोगी पडणं हे होतं.
दक्षिण आफ्रिकेत पोचल्यावर तिसऱ्याच दिवशी गांधीजींना न्यायालयात अपमानित केलं गेलं. त्यांनी ताबडतोब ही घटना स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केली आणि रातोरात प्रसिद्धी मिळवली. ३५ व्या वर्षी त्यांनी इंडियन ओपिनियनची जबाबदारी स्वीकारली आणि त्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना एकत्र आणलं आणि मार्गदर्शन केलं. इंडियन ओपिनियनच्या अंकात ते जीव ओतून लिहीत असत आणि दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या सत्याग्रहाचा तपशीलवार अहवाल प्रसिद्ध करत. त्यांच्या लेखनातून परदेशामधल्या वाचकांना दक्षिण आफ्रिकेचं खर चित्र मिळत असे. अशा वाचकांपैकी विशेष वाचक होते. भारतात गोखले, इंग्लंडमध्ये दादाभाई नौरोजी आणि रशियात टॉलस्टॉय. दहा वर्षे या साप्ताहिकासाठी गांधीजींनी अतोनात कष्ट घेतले.
गांधीजींनी आपल्या वृत्तपत्राचा खप वाढावा म्हणून अयोग्य मार्ग स्वीकारले नाहीत. त्याचबरोबर इतर वृत्तपत्राबरोबर कधीही स्पर्धा केली नाही. भारतातही ३० वर्षे त्यांनी जाहिराती न स्वीकारता त्यांची नियतकालिके चालवली. "यंग इंडिया" चं संपादकपद स्वीकारल्यानंतर त्यांना गुजराथी वर्तमानपत्र सुरु करायचंच होतं कारण स्थानिक भाषेतील वृत्तपत्र ही गरज जाणवत होती. 'नवजीवन' नावाचं हिंदी आणि गुजराथीत प्रसिद्ध होणारं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं ते अर्थात "यंग इंडिया" चं स्थानिक रुप होतं.
गांधीजी अभिमानानं म्हणत, "माझी महत्वाकांक्षा सामान्य जनतेपर्यंत पोचण्याची आहे. ते स्थानिक भाषांमधूनच करणं शक्य आहे. माझी भाषा साधी आणि रांगडी आहे. नवजीवनचे वाचक घोडगाड्यांचे चालक आहेत,कामगार आहेत. मला हे पत्र शेतकऱ्यांपर्यंत आणि विणकारांपर्यंत त्यांच्या झोपडीत पोचायला हवं आहे. कारण भारत त्यांचाच आहे. इंग्रजी वृत्तपत्राच संपादन करण्यात त्यांना आनंद नव्हता. कारण इंग्रजी वाचणारी लोकसंख्या फार कमी होती.
भारतात त्यांनी एकही वृत्तपत्र तोट्यात चालवलं नाही. त्यांच्या इंग्रजी आणि स्थानिक भाषामधल्या वृत्तपत्रांचे४०,००० वर्गणीदार होते. ते तुरुंगात असताना ही संख्या ३००० वर आली. तुरुंगात असताना त्यांनी 'हरिजन' नावाचं आणखी एक साप्ताहिक सुरु केले. ते मुख्यता: अस्पृशांच्या सेवेसाठी होतं. अनेक वर्षे त्यात एकही राजकीय लेख नव्हता. हरिजन हे साप्ताहिक इंग्रजी, हिंदी, उर्दू, तमिळ, तेलगु, उडिया, मराठी, गुजराथी, कानडी आणि बंगाली भाषांमधून प्रसिद्ध होत असे. ते स्वतः हिंदी, उर्दू, गुजराथी आणि इंग्रजीत लेख लिहीत.
गांधीजींच्या वृत्तपत्रात कधीही चटकदार विषय नसत. त्यांनी अथकपणे रचनात्मक काम,सत्याग्रह, अहिंसा, आहार,निसर्गोपचार, कुटिरोद्योग आणि दारूबंदी यांच्यावर लिहिलं. त्यांनी शिक्षणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. आहाराच्या सवयीबद्धल लिहिलं आणि भारतभरातल्या लोकांच्या दोषांचेही ते कडक टीकाकार होते.
संदर्भ -- बहुरूप गांधी
अनु बंदोपाध्याय
संग्राहक -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा