!! पाऊले चालती पंढरीची वाट !! (१३ )
आज सकाळी ६.३० वाजता नातेपुतेहुन पालखीचे प्रस्थान झाले.पालखी मार्गावर नातेपुतेकरानी आजही गर्दी केली होती.आम्ही पालखी मार्गावर चालत असताना मा. ना.विनोदजी तावडे आमच्या दिंडीत सहभागी झाले.आजही पालखी मार्गावर वारकऱ्यांना अल्पोपहार, चहा,बिस्किटे, केळी दिली जात होती.
पालखीचा पहिला विसावा मांडवे येथे होता.विसाव्याच्या प्रत्येक ठिकाणी यात्रेचे स्वरुप आलेले असते. या विसाव्याच्या ठिकाणी आम्ही अल्पोपहार घेतला. नातेपुते मांडवे मार्गावर झाडांनी सुंदर कमान केली होती. हे दृश्य अतिशय मनमोहक होते. सदाशिवनगर येथे शाळेत समाज प्रबोधनाचा कार्यक्रम चालु होता. या कार्यक्रमातून ज्वलंत समस्येवर प्रकाशझोत टाकला जात होता.यामध्ये शौचालय बांधकाम,वृक्षारोपण, मुलींचे शिक्षण,महाराष्ट्रगीत आदींचा समावेश होता.सदाशिवनगर येथे दुपारी भोजनाचा आस्वाद घेतला. याठिकाणी पहिले गोल रिंगण झाले. रिंगणात माऊलींचा अश्व धावत असताना सगळे वारकरी "माऊली माऊली "असा गजर करीत होते. रिंगण झाल्यानंतर माऊलींच्या पायाखालची "पवित्र माती" सगळेजण आपल्या माथी लावत होते. आणि घरीही घेऊन जात होते.
दुपारनंतर पालखी पुरंदावडे येथे विसावली. थोड्याच वेळात पालखी माळशिरस च्या दिशेने मार्गस्थ झाली.माळशिरसकरानी पालखीचे उस्फुर्तपणे स्वागत केले.
आज आमची निवासव्यवस्था ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मुंबई शाखा माळशिरस तर भोजन व्यवस्था पतसंस्थेचे प्रतिनिधी संतोष थोरात यांनी केली होती.
दुपारनंतर आम्ही रस्त्यांनी चालत असताना "हरिनामाची शाळा "हे गीत काही महिला म्हणत होत्या. ते आपल्या माहितीसाठी --
हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात,
विठ्ठल रुक्मिणी मास्तर होते शिकवायला शाळेत !!धृ!!
शाळेमध्ये शिकायला आले वारकरी हो संत!
सावळ्या हरीचे नामघेऊन झाले भाग्यवंत!
पुंडलिक तो मास्तर होता साऱ्या या संतात!!१!!
पुंडलिकाची भक्ती पाहुनी खूश झाले मास्तर!
दोन्ही हातात उभे राहिले विठू विटेवर !
अशी शाळा कुठे नाही साऱ्या या संतात!!२!!
विठ्ठल ,नामदेव,गोरोबा, तुकोबा, एकनाथ भजनी होते दंग!
विठ्ठल विठ्ठल हरिनाम करिता चौघे झाले दंग!
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, अभंग हरिपाठ!!३!!
अभंग,कीर्तन, भारुड होतील, जातील हो शाळेत!
पांडुरंगाचे नाम घेऊन उभे जीवनात!
भजनाद्वारे जाऊ आता पंढरीच्या शाळेत!!४!!
हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात,
विठ्ठल रुक्मिणी मास्तर होते शिकवायला शाळेत!!धृ!!
या गीतामधून गुरुशिष्याचं नातं कसे असे असावे हे स्पष्ट होते. गुरुशिष्य नाते दृढ असेल तर शिक्षण अधिक सक्षमपणे होते असे मला वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा