!! चैत्रपालवी --२०१९ !!
कृषी संस्कृतीची सावली -- चैत्रपालवी २०१९ शेतीच्या नव्या वाटांचा धांडोळा - बदलत्या हवामानात शेतीपद्धतीत बदल घडवून मशागत ते मार्केट तसेच पूरक व्यवसायाची जोड देऊन शेती व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ,बारामती येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट,बारामती याठिकाणी चालत असलेल्या सर्व कामांची माहिती चित्रफितीद्वारे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शाकीर अली सय्यद तसेच विवेक भोईटे यांनी केले. सुरुवातीला जलतज्ञ सुधीर भोंगळे, एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे सदस्य विजय बोराडे व विष्णुपंत हिंगे यांचे स्वागत करण्यात आले. लगेचच वेगवेगळ्या विषयांवर गटचर्चा झाली. मी पशुसंवर्धन विषयावरील गटचर्चेत सहभागी झालो.
नंतर निरा येथील शेततळ्यातील मस्याशेतीला भेट दिली. कमीतकमी जागेत लहान मास्यांना वाढवून नंतर शेततळ्यात सोडले जाते. पक्ष्याचा त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण शेततळ्यावर जाळी लावलेली दिसुन आली. निरा येथील भेट संपवून फलटण येथील के.बी. एक्सपोर्ट कडे रवाना झालो. के. बी. एक्सपोर्टसचा परिसर पाहुन भारावून गेलो. या ठिकानाहून भेंडी, दुधीभोपळा व बेबीकॉर्न यांची निर्यात होते.
दुधी भोपळा १३ रु. प्रतिकिलो, भेंडी २७ रु. प्रतिकिलो तर बेबीकॉर्न ७ रु. प्रतिकिलो दराने बांधावरून खरेदी केला जातो.शेतकऱ्यांना बियाणे , खते , किटक नाशके पुरवली जातात. औषध फवारणी कंपनीच्या मनुष्यबळाकडून होते. येथे मोठ्याप्रमाणावर दशपर्णी अर्क तयार केला जातो. थोडक्यात सेंद्रिय शेती काळाची गरज असल्याचे त्या प्रोजेक्टवरून दिसून येते. यापुढे शेती व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर गटशेतीशिवाय पर्याय नाही हेच आजच्या भेटीतून दिसून येते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा