!! चैत्रपालवी -- २०१९ (२ )
आज चैत्रपालवीचा दुसरा दिवस, सुरुवातीस ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात ते म्हणाले की, चैत्रपालवी हा उपक्रम वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी आहे. आपण नेहमीच नाविन्याचा शोध घ्यावयास हवा. या कार्यक्रमाबाबत मी अजुनही समाधानी नसल्याचे ते म्हणाले. माणसाने अल्पसंतुष्ट असता कामा नये. "ठेविले अनंते तैसेचि का राहावे! चित्ती नसू ध्यावे समाधान!" असेही ते म्हणाले.कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री मा.शरद पवार, माजी सचिव सुधीरकुमार गोयल, महाराष्ट्राचे कृषिआयुक्त सुहास दिवसे, कृषी सहसंचालक दिलीप शेंडे , माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, आत्मा पुणेचे संचालक अनिल बनसोडे आदि उपस्थित होते.
आपल्या बीजभाषणात शरद पवार म्हणाले की, शेतीस पशुपालनाचा जोडधंदा दिल्याने शेतकऱ्याचे जीवनमान उंचावले. जीवनमान कसे उंचावले यासाठी एका कुटुंबात कसाकसा बदल होत गेला हे त्यांनी मार्मिकपणे सांगितले. सुरुवातीला परातीत चहा, कानतुटका कप, सुंदर कप, बसायला घोंगडी, सतरंजी, सोफासेट हा बदल केवळ शेतीतील उत्पनामुळे झाला आहे. जीवनमानात सुधारणा होण्यात महिलांचा सहभाग खूप मोठा आहे. शिकलेल्या मुली सुना म्हणून आल्यानेदेखील शेतीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला आहे. ते पुढे म्हणाले की, कोणालाही फुकट काही मिळता कामा नये. पाण्याचा वापर योग्यरित्या करता आला पाहिजे. पिकास मोजूनच पाणी दिले पाहिजे. दरएकरी उत्पादकता वाढवता आली पाहिजे. मानकांचा वापर करून मार्केटिंग करता आले पाहिजे. आपण कमी पाण्याची पीके घ्यावयास हवीत. शेतीवरचा अतिरिक्त भार कमी करता आला पाहिजे. शेतजमीन दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आपण रस्ते, शहरीकरण, औद्योगिकरण यासाठी जमिनीचा वापर करतो. या सर्व गोष्टींचा आपण बारकाईने विचार केला तरच आपली प्रगती आहे.
मार्गदर्शन करताना सुहास दिवसे म्हणाले की, आपण तंत्रज्ञान अवगत करावयास हवे . आता आपली स्पर्धा जगाशी आहे. आपण कमीतकमी खर्चात उत्पादन करावयास हवे. कृषिविभागानेदेखील ज्ञान लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करावयास हवे. आपण चांगल्या दर्जाचा माल बनवा, बाजारात जे विकते तेच पिकवा, ग्राहकांच्यापर्यंत पोहचण्याचा सल्ला त्यांनी दिला. आपणामध्ये communication, co-ordination , collaboration असावयास हवे.
कार्यक्रमात शेवटी आभार प्रदर्शन डॉ. विवेक भोईटे यांनी मानले. आजच्या कार्यक्रमातून शेतीचा जोडधंदा, प्रक्रियाउद्योग, पाण्याचा योग्य प्रमाणात वापर, महिलांचे सामाजिक बदलातील योगदान, शेतीची सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती मिळाली असे मला वाटते.
शब्दांकन -- आर. व्ही . पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा