आर्थिक शेतीबरोबर आरोग्य शेतीचा विचार होणे आवश्यक : अंकुश सोनावले
सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर बोलताना नागठाणे मंडळाचे कृषी पर्यवेक्षक अंकुश सोनावले म्हणालेकी, आर्थिक शेतीबरोबर आरोग्य शेतीचा विचार होणे आवश्यक आहे. वाढत्या रासायनिक खतांचा वापरांमुळे आपणास विषमुक्त अन्न मिळत नाही. आपणास आर्थिक लाभ होताना दिसत आहे परंतु आरोग्याला फार मोठी हानी पोहचत आहे. आपले आरोग्य चांगलं राहायचं असेल तर ज्वारी, बाजरी, राळा, नाचणी यांचाआहारात वापर वाढवायला हवा. लाकडी घाण्याचे तेल वापरायला हवे, आपल्या घरी एखादी गीर गाय किंवा पंढरपुरी म्हैस पाळायला हवी जेणेकरून घरच्याघरी दूध मिळू शकेल, असे केले तरच आपलं आरोग्य चांगलं राहील. सातारा जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवासंघाने रणजित कौर गडोख महाराष्ट्र विद्यालय अतित येथे रविवार दिनांक २६ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त केले होते.
यावर्षी सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचेदेखील अमृत महोत्सवी वर्ष आहे.संघाने या वर्षानिमित्त वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की,आपण शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहायला हवे. प्रत्येक शेतकऱ्याने जमाखर्च लिहिला पाहिजे.शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत . रासायनिक खतांचा वापर कमीत कमी केला पाहिजे. बिजनेसमध्ये वाढ द्यायला हवी. संघाचे विद्या सचिव अरुण माने यांनी सेंद्रिय शेतीबाबत १२ वर्षात स्वतः च्या शेतीत केलेले प्रयोग सांगितले.
सेंद्रिय शेतीत यशस्वी होण्यासाठी गट शेतीला पर्याय नाही. शेतकऱ्यांनी स्वतःचे मार्केट स्वतः तयार करायला हवे तरच आपला टिकाव लागणार आहे. अभिजीत जाधव यांनी सेंद्रिय शेती गटावर जोर दिला. पाहुण्यांचे स्वागत संघाचे अध्यक्ष एस. बी. खराते यांनी तर प्रास्ताविक संघाचे सचिव आर. एल.नायकवडी यांनी केले. पाहुण्यांची ओळख मोहनराव जाधव यांनी करुन दिली. सदरच्या कार्यक्रमास अतीत पंचक्रोशीतील प्रयोगशील शेतकरी, संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. शेवटी ए. पी. पाटील यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण सेंद्रिय शेतीवर भर द्यायला हवा असे वाटते.
राजेंद्र पवार
संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई
९८५०७८११७८
८१६९४३१३०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा