!! गरवारे वाई हाफ मॅरेथॉन २०२४ !! (८ डिसेंबर)
आज रविवार दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी वाई नगरीत गरवारे वाई हाफ हील मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेची सुरुवात द्रविड हायस्कूल वाई येथून पहाटे ६:१५ वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते फ्लॅग ऑफ ने झाली. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हटले गेले. राष्ट्रप्रेमाने वातावरण भारून गेले. यामध्ये ३ किलोमीटर फन रन, १० किलोमीटर, २१ किलोमीटर असे इव्हेंट होते.
आज मी २१ किलोमीटर मध्ये भाग घेतला होता.मला आपल्या जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील इतकेच नव्हे तरआंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक धावपटूंबरोबर धावता आले. एकापेक्षा एक सरस असेच रनर यामध्ये सहभागी झाले होते. आज मी ही स्पर्धा १:५६:०२ एक तास छपन्न मिनिटे आणि दोन सेकंदात पूर्ण केली. आजचा माझा वयोगट ५५ वर्षापुढील होता. या कॅटेगरी मध्ये माझा ६ वा क्रमांक आला. या कॅटेगरी मध्ये माझ्यापेक्षा १०/११ वर्षांनी लहान असणारे अनेक स्पर्धक असल्याने माझा नंबर येण्याची शक्यता नव्हती. तरीही मिळालेले यश निश्चितच प्रेरणादायी आहे.
माझ्या यशामागे विशाल घोरपडे यांचे खूप परिश्रम आहेत.ते माझ्याबरोबर धावले , धावताना बऱ्याचश्या टिप्स दिल्या. वेळप्रसंगी मदतीचा हात दिला. थोडक्यात छानपैकी रुट सपोर्ट दिला. त्यामुळे मला कमी वेळ साधता आली. स्वास्थ्यम फिटनेस क्लबचेही नेहमीच मार्गदर्शन असते. आज अविनाश सुतार यांचीही खूप मदत झाली. मला प्रोत्साहन देण्यासाठी वाईच्या ज्ञानदीप शैक्षणिक संकुलाचे चेअरमन दिलीप चव्हाण ही आलेले होते. थोडक्यात माझ्या यशात अनेकांचा वाटा आहे.
आजच्या स्पर्धेची सुरुवात द्रविड हायस्कूलपासून झाली. सुरुवातीला काही वेळ अंधार होता. कृष्णा नदी ओलांडून गणपती मंदिर, शाहीर चौक, इतिहास प्रसिद्ध मेणवली , भोगाव, वरखडवाडी धोम, धोम धरण आणि टर्न असा मार्ग होता. स्पर्धेचा मार्ग चढउताराचा होता.धावपटुना प्रोत्साहन देण्यासाठी जागोजागी वाद्यवृंद होते त्यामुळे स्पर्धकांचा जोश वाढत होता.स्पर्धा मार्ग हा नदीच्याकडेने असल्याने जणू काही नागमोडी वळणावरून आपण धावत आहोत असे वाटत होते.याठिकाणी काही काव्य पंक्ती नमूद कराव्यास वाटतात.
असे जगावे दुनियेमध्ये ,आव्हानाचे लावून अत्तर!
नजर रोखुनी नजरेमध्ये ,आयुष्याला द्यावे उत्तर!
अशी दांडगी इच्छा ज्याची ,मार्ग तयाला मिळते सत्वर !
या स्पर्धेत सब टू होणे अभिमानास्पद मानले जाते. तो मान आपणा सर्वांच्यामुळे मला मिळालेला आहे. वाई मॅरेथॉनचे घोष वाक्य होते,
"निरतिशयम धावन्ती, !! run beyond limits !!"
वाई मॅरेथॉनमुळे ग्रामीण भागात चांगले खेळाडू तयार होत आहेत ही अभिमानाची बाब आहे. चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम केला पाहिजे. "धावणे तुमच्या शरीरासाठी उत्तम आहे. "Health is Wealth आपण सर्वजण नियमितपणे व्यायाम करुया, स्वतः आरोग्य संपन्न राहूया.
राजेंद्र पवार
संचालक,
शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई
९८५०७८११७८.
८१६९४३१३०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा